लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शहरात पालिकेच्या वतीने प्लास्टिक वेचा मोहीम राबविण्यात आली असून, या मोहिमेत विविध शाळेतील विद्यार्थ्यांसह नागरिक सहभागी झाले होेते. तब्बल ७२० सिमेटच्या गोण्या (पोती) प्लास्टिक वेचून त्याची औद्योगिक वसाहतीतमध्ये विल्हेवाट लावण्यात आली आहे. शहरात ३० नोव्हेंबरपर्यंत प्लास्टिक वेचा मोहीम राबविण्यात येणार आहे.या मोहिमेत न. प. अध्यक्ष बाबाराव बांगर, उपाध्यक्ष दिलीप चव्हाण, माजी नगराध्यक्षा अनिता सूर्यतळ यांच्यासह सर्व नगरसेवक, सीओ रामदास पाटील, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष रमेशचंद्र बगडिया, बडेरा, किराणा असोसिएशनचे पदाधिकारी, घुगे, एन. सी.सी.चे विद्यार्थी, सेक्रेट हार्ट शाळेतील विद्यार्थी, शहरातील बचत गट, गोकुळधाम गृह निर्माण संस्थेचे पदाधिकारी सहभागी झाले होते. शहरातील संपूर्ण भागात मोहीम राबवून प्लास्टिक जमा केले. मोहिमेत नागरिकही मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. संपूर्ण गोळा केलेला कचरा औद्योगिक वसाहतीकडे नेऊन त्याची विल्हेवाट लावण्यात आली. विशेष म्हणजे शहरात स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून ३० नोव्हेंबरपर्यंत प्लास्टिक वेचा मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यामुळे रस्त्यावर कोणीही प्लास्टिक न टाकण्याचे आवाहन पालिकेतर्फे केले आहे. मोहिमेत जवळपास ४०० च्यावर नागरिक सहभागी होते. तर १ डिसेंबर पासून शहरात १०० टक्के प्लास्टिक मोहीम राबविली जाणार असून, ओला व सुखा कचरा वेगवेगळा के जाणार आहे. जिल्ह्यातील विविध गावांतही प्लास्टिक वेचा मोहीम राबविण्यात आली.
शहरात ७२० पोती प्लास्टिक जमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 00:10 IST
शहरात पालिकेच्या वतीने प्लास्टिक वेचा मोहीम राबविण्यात आली असून, या मोहिमेत विविध शाळेतील विद्यार्थ्यांसह नागरिक सहभागी झाले होेते. तब्बल ७२० सिमेटच्या गोण्या (पोती) प्लास्टिक वेचून त्याची औद्योगिक वसाहतीतमध्ये विल्हेवाट लावण्यात आली आहे.
शहरात ७२० पोती प्लास्टिक जमा
ठळक मुद्देस्वच्छता मोहीम : नागरिकांचा सहभाग