शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

७० हजार पाट्या गंजताहेत...

By admin | Updated: April 25, 2016 00:49 IST

औरंगाबाद : शहरातील प्रत्येक घराला क्रमांक असावा, त्यावर महापालिकेची एक लोखंडी पट्टी असावी, कोणालाही क्रमांकावरून घर सापडले पाहिजे, असे स्वप्न दहा वर्षांपूर्वी मनपा प्रशासनाने बघितले होते.

औरंगाबाद : शहरातील प्रत्येक घराला क्रमांक असावा, त्यावर महापालिकेची एक लोखंडी पट्टी असावी, कोणालाही क्रमांकावरून घर सापडले पाहिजे, असे स्वप्न दहा वर्षांपूर्वी मनपा प्रशासनाने बघितले होते. त्यादृष्टीने तयारीही करण्यात आली. ७० हजार मालमत्तांना घर क्रमांक देण्यासाठी लोखंडी पट्ट्याही तयार करण्यात आल्या. नेहमीप्रमाणे हे काम करणारी हैदराबाद येथील ‘स्पेक’ ही संस्था अर्ध्यावर काम सोडून निघून गेली. या संस्थेने तयार केलेल्या घराच्या पट्ट्या आजही मनपात पडून आहेत.महानगरपालिकेत चांगली कल्याणकारी योजना कधीच यशस्वी होत नाही. कचऱ्यापासून खतनिर्मिती, शहर वाहतूक बस, शहरातील संपूर्ण कचरा उचलण्याचा ठेका घेणारी रॅमकी, मोफत अंत्यसंस्कार योजना, अशा कितीतरी योजना बंद पडल्या. २००६-०७ या आर्थिक वर्षात तत्कालीन आयुक्त असिमकुमार गुप्ता यांनी हैदराबाद येथील स्पेक या संस्थेला मनपात पाचारण केले होते. या संस्थेने शहरातील प्रत्येक मालमत्तेचा शोध घ्यावा. मालमत्ताकर लागलेला नसेल तर कर लावावा. कर नगर परिषदेच्या कालावधीतील असेल तर नवीन दराने लावावा म्हणून काम देण्यात आले होते. स्पेक या संस्थेने कामही सुरू केले. दीड ते दोन वर्षांमध्ये स्पेक मालमत्ताधारकांना अत्यंत चुकीच्या पद्धतीने कर लावत असल्याचा आरोप नगरसेवकांकडून करण्यात आला. शेवटी या संस्थेला मनपातून हाकलून लावण्यात आले. तत्पूर्वी या संस्थेला १ कोटी १८ लाख रुपये देण्यात आले होते. संस्थेने केलेल्या कामाचा एक रुपयाही फायदा मनपाला झाला नाही. आता दहा वर्षांनंतर परत मनपा खाजगी संस्थेमार्फतच मालमत्तांचा शोध घेणार आहे. दहा वर्षांपूर्वी स्पेकला १ लाख ४४ हजार मालमत्तांचा फेरआढावा घेण्याचे काम देण्यात आले होते. आज १ लाख ९० हजार मालमत्तांचा आढावा मनपाला घ्यावा लागणार आहे.दहा वर्षांपूर्वी स्पेकला काम दिले तेव्हा प्रत्येक घरावर एक लोखंडी पट्टी लावावी, असे आदेश मनपाने दिले होते. काही मालमत्तांवर या पट्ट्या बसविण्यातही आल्या. या पट्टीवर घर क्रमांक, परिसर, मालमत्तेचे विवरण लिहिण्यात आले होते. मागील दहा वर्षांपासून या लोखंडी पट्ट्या आजही मनपाच्या इमारत क्रमांक ३ मधील तिसऱ्या मजल्यावर धूळखात पडल्या आहेत.असा होता करारएका नवीन मालमत्तेचा शोध लावल्यास स्पेक या संस्थेला १५३ रुपये देण्याचा करार मनपाने संस्थेसोबत केला होता. संस्थेतर्फे शहरातील मालमत्तांवर लोखंडी पाट्याही लावण्याचे काम देण्यात आले होते.संस्थेने ४० हजार पाट्या लावल्या. ७० हजार पाट्या पडून असल्याचा दावा मनपा करीत आहे.