शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात ७० टक्के दूध भेसळयुक्त -खोतकर

By admin | Updated: January 3, 2017 00:06 IST

जालना : राज्यात जवळपास ७० टक्के दूध भेसळयुक्त असून, यावर कारवाईचे व तपासणीचे अधिकार अन्न व औषधी प्रशासनाकडे आहेत.

जालना : राज्यात जवळपास ७० टक्के दूध भेसळयुक्त असून, यावर कारवाईचे व तपासणीचे अधिकार अन्न व औषधी प्रशासनाकडे आहेत. या विभागाकडे अगोदरच भरपूर व्याप असून, दूध तपासणीचे अधिकार पशुसंवर्धन विभागाकडे द्यावे, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. यास त्यांनी तत्वत: मान्यता दिल्याची माहिती पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्य व्यवसाय राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात वस्त्रोद्योग व दुग्ध व्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली. त्यानंतर राज्यमंत्री खोतकर यांनी पत्रपरिषदेत माहिती दिली.राज्यमंत्री खोतकर म्हणाले, रेशिम उत्पादनात जालना राज्यात आघाडीवर आहे. येथील रेशिम कोष बंगळूरु येथे विक्रीसाठी जातो. शेतकऱ्यांची गैरसोय दूर व्हावी, यासाठी जालन्यात रेशिम क्लस्टरसाठी प्रस्ताव तयार करण्यात आला. औरंगाबादेत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत रेशिम क्लस्टरसाठी ५ कोटी ८६ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. यासाठी भूखंड निश्चित झाला असून, येत्या आठ दिवसांत इमारतीचे भूमिपूजन करण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी दिली. सद्यस्थितीत जालना जिल्ह्यात केवळ दहा हजार लिटर दुध संकलन केले जाते. शेतीपूरक व्यवसायाद्वारे शेतकऱ्यांना मदत होणार असल्याने गाय-गटशेळी पालन पथदर्शी प्रकल्प जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. ५० टक्के अनुदान तत्त्वावर हा प्रकल्प असून, एक हजार ५०० प्रस्तावाचे नियोजन केले आहे. विनाविलंब प्रस्ताव मंजूर करण्याच्या सूचना आपण बँक अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तसेच आरेचा ए-२ प्लान जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. या योजनेनुसार जालन्याचे उच्च दर्जाचे दूध पुणे, मुंबईत विकले जाऊ शकणार आहे. यातून शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावणार असल्याचे राज्यमंत्री खोतकर म्हणाले.