शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

बौद्ध स्मशानभूमीसाठी ७० लाख

By admin | Updated: August 29, 2014 01:30 IST

परभणी : शहरातील दलित वस्तीमध्ये ५० टक्के निधी देण्याचे मान्य करीत धाररोडवरील बौद्ध समाजाच्या स्मशानभूमीसाठी ७० लाख रुपयांचा निधीला महापौर प्रताप देशमुख यांनी मान्यता दिली आहे.

परभणी : शहरातील दलित वस्तीमध्ये ५० टक्के निधी देण्याचे मान्य करीत धाररोडवरील बौद्ध समाजाच्या स्मशानभूमीसाठी ७० लाख रुपयांचा निधीला महापौर प्रताप देशमुख यांनी मान्यता दिली आहे.शहर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा महापौर प्रताप देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली २८ आॅगस्ट रोजी बी.रघुनाथ सभागृहात पार पडली. आयुक्त अभय महाजन, उपायुक्त रणजीत पाटील, नगरसचिव चंद्रकांत पवार यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. प्रारंभी मागील सभेच्या इतिवृत्तांतास मान्यता देण्यात आली. दलित वस्ती निधीअंतर्गत २०१४-१५ करीता प्रस्तावास मान्यता व निर्णय घेण्याच्या विषयावर चर्चा झाली. त्याचप्रमाणे बौद्ध समाजाच्या स्मशानभूमीला लागूनच असलेल्या लिंगायत स्मशानभूमीसाठी निधी देण्याचे या सभेत मान्य केले. दलित वस्तीमध्ये २०१४-१५ मध्ये ३ कोटी ६४ लाख रुपये मंजूर केले आहेत. या विषयावर अनिता सोनकांबळे, सचिन देशमुख, सुनील देशमुख, सय्यद अहमद, गुलमीर खान, रझिया बेगम, युनूस सरवर, चाँद सुभाना जाकेर खान या नगरसेवकांनी प्रत्येक समाजातील स्मशानभूमीसाठी निधी द्यावा, अशी मागणी केली. ही मागणी महापौरांनी मान्य केली.शहरात नवीन रस्त्यांना मंजुरी देण्यात येणार आहे, या वियषावर चर्चेदरम्यान नगरसेवक शिवाजी भरोसे, अ‍ॅड. जावेद कादर, सुनील देशमुख, विजय धरणे, सय्यद अहमद, श्याम खोबे, शांताबाई लंगोटे, संगीता कलमे यांनी आमच्या प्रभागात रस्त्याची कामे घ्यावीत, अशी मागणी केली. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या कामांना प्राप्त अनुदानाव्यतिरिक्तची कामे प्राप्त होणाऱ्या रस्ता अनुदानातून करण्याच्या विषयावर विरोधी पक्ष नेते भगवान वाघमारे यांनी कामास मंजुरी दिली. या सर्वसाधारण सभेत विविध विषयावर झालेल्या झालेल्या चर्चेमध्ये गुलमीर खान, शिवाजी भरोसे, विजया कनले, संगीता वडकर, शांताबाई लंगोटे, संगीता कलमे, विजय धरणे, डॉ.विवेक नावंदर, उदय देशमुख, सचिन देशमुख, चाँद सुभाना जाकेर लाला, सईदा बेगम इफ्तेखारोद्दीन, रजिया बेगम, आमेनाबी शेख नबी, तिरुमला खिल्लारे, अब्दुला फातेमा अब्दुल जावेद, सचिन कांबळे, मुखीम काजी, रुक्साना बेगम रौफ खान, अमरिका बेगम अ. समद आदींनी सहभाग घेतला. या सभेत शहरातील विविध विकासप्रश्नांवर चर्चा झाली. (प्रतिनिधी)