शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी बांधकामासाठी ७ कोटी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2016 00:04 IST

हिंगोली : जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाला अंगणवाडी बांधकामासाठी ७ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला

हिंगोली : जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाला अंगणवाडी बांधकामासाठी ७ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. मार्चएण्डपर्यंत तो प्राप्त होण्याची शक्यता असून विविध ठिकाणी जागांचा शोध घेण्यात येत आहे.महिला व बालकल्याण विभागातर्फे ग्रामीण भागात ६ एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयांमार्फत एकूण १0८९ अंगणवाड्या सुरू आहेत. त्यापैकी जागा नसल्यामुळे ६९ अंगणवाड्यांचे बांधकाम झाले नव्हते. तर असलेल्या अंगणवाड्यांपैकी अनेक बांधकामे जुनी असल्याने मोडकळीस आली आहेत. त्यांच्या दुरुस्तीसाठीही शासनाकडून निधी मिळत नाही. मात्र ६९ पैकी २५ ठिकाणच्या जागेचा प्रश्न सुटला असल्याने ही कामे नजीकच्या काळात करणे शक्य आहे. तर उर्वरित ४४ ठिकाणी अंगणवाडीसाठी जागा शोधणे हा पर्याय वापरावा लागणार आहे. त्यासाठी ग्रामपंचायतींनी पुढाकार घेण्याचे आवाहन महिला व बालकल्याण विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती ढेरे यांनी केले आहे.यामध्ये आखाडा बाळापूर -१२, वसमत १४, हिंगोली-५, कळमनुरी-२, सेनगाव-१, औंढा-२ अशी प्रकल्पनिहाय जागेची आवश्यकता असलेली ठिकाणे आहेत. यामध्ये कळमनुरी तालुक्यात आखाडा बाळापूर प्रकल्पांतर्गत वारंगा फाटा, जवळा त.ह., चिंचवडी, तोंडापूर तांडा, दत्तसावंगी, देववाडी वरुड, भुवनेश्वर, वरूड, वसमत प्रकल्पात एकरुखा, पारवा, कौडगाव, ब्राह्मणगाव बु., नागापूर, जवळा वसाहत, नहाद, कुडाळा, टेंभूर्णी, पांगरा सती, खंदारबन, हिंगोली प्रकल्पांतर्गत बासंबा, नर्सी, पहेनी, माळधामणी, कळमनुरी प्रकल्पांतर्गत बाभळी, जांभरुण, कारवाडी नांदापूर, खरवड, टाकळगव्हाण, चिंचोर्डी, मसोड, सेनगाव, गोरेगाव, साबरखेडा, हट्टा तांडा, गोरेगाव१, २,३,४,५, पळशी, भगवती जुनी, औंढा प्रकल्पांतर्गत गोळेगाव, शिरड शहापूर, दुधाळा, लक्ष्मणनाईक तांडा या गावांत अंगणवाड्यांसाठी जागेची गरज आहे. सरपंच व ग्रामसेवकांनी पुढाकार घेतल्यास चिमुकल्यांच्या विसाव्याची व्यवस्था होणार आहे.ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी पूर्वप्राथमिक शिक्षणाचे धडे देणाऱ्या या ज्ञानमंदिरांसाठी उदासीनता सोडून दानशूर मंडळींनीही पुढाकार घेतला तर हे अशक्य नाही. त्यासाठी संबंधितांनी निश्चित केलेले नाव अंगणवाडीला देण्याचीही तयारी आहे. अन्यथा यावेळीही निधी परत जाण्याची भीती आहे. प्रतिअंगणवाडी ६ लाख याप्रमाणे निधी असून यात किचनशेडचाही समावेश आहे. (जिल्हा प्रतिनिधी)