शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

७ हमीभाव खरेदी केंदे्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 01:24 IST

जिल्ह्यात सहा ठिकाणी सीसीआयमार्फत तर एका ठिकाणी पणन महासंघामार्फत कापसाची हमीभावाने खरेदी करण्यात येणार आहे. एक नोव्हेंबरपासून प्रत्यक्ष कापूस खरेदीला सुरुवात होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात सहा ठिकाणी सीसीआयमार्फत तर एका ठिकाणी पणन महासंघामार्फत कापसाची हमीभावाने खरेदी करण्यात येणार आहे. एक नोव्हेंबरपासून प्रत्यक्ष कापूस खरेदीला सुरुवात होणार आहे.जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांनी गुरुवारी जिल्हा उपनिबंधक एन. व्ही. आघाव व संबंधित अधिका-यांची महत्त्वपूर्ण बैठक घेतली. जालना, बदनापूर, परतूर, मंठा, भोकरदन व जाफराबाद या ठिकाणच्या कापूस खरेदी केंद्रावर एक नोव्हेंबरपासून सीसीआयमार्फत हमीभावाने कापूस खरेदीला सुुरुवात करण्यात येणार आहे. तसेच कापूस उत्पादक पणन महासंघाच्या कुंभारपिंपळगाव येथील केंद्रावर हमीभावाने कापूस खरेदीला सुरुवात झाली आहे. शेतक-यांना हमीभाव केंद्रावर कापूस विक्रीसाठी आणण्यापूर्वी आॅनलाइन नोंदणी करावी लागणार आहे. संबंधित तालुक्याच्या बाजार समितीमध्ये आॅनलाईन नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नोंदणीसाठी शेतकºयांना कापसाचा पीकपेरा असलेला चालू हंगामातील सातबारा, आधारकार्ड, बँक पासबुकची झेरॉक्स व मोबाईल क्रमांक आवश्यक राहणार आहे. नोंदणी केल्यानंतर शेतक-यांना केंद्रावर कोणत्या दिवशी कापूस विक्रीला घेऊन यायचा, याबाबत मोबाईलवर संदेश पाठविण्यात येणार आहे. ज्या दिवशी कापूस विक्रीसाठी आणायचा संदेश प्राप्त झाला, त्याच दिवशी शेतक-यांनी आपला कापूस विक्रीस आणावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. बैठकीस जालना बाजार समितीचे सचिव गणेश चौगुले, कापूस पणन महासंघ, वेअर हाऊस कॉर्पोरेशन, खरेदी विक्री संघांचे अधिकारी व प्रतिनिधी उपस्थिती होते.