शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

उमरदऱ्यासाठी ६८ लाखांचा निधी मंजूर

By admin | Updated: June 23, 2014 00:24 IST

जळकोट : कायम पाणीटंचाई समस्येचा त्रास सहन करणाऱ्या जळकोट तालुक्यातील उमरदरा गावासाठी राष्ट्रीय पेयजल योजनेतून ६८ लाख रूपये किमतीची नळ पाणीपुरवठा योजना नुकतीच मंजूर झाली

जळकोट : कायम पाणीटंचाई समस्येचा त्रास सहन करणाऱ्या जळकोट तालुक्यातील उमरदरा गावासाठी राष्ट्रीय पेयजल योजनेतून ६८ लाख रूपये किमतीची नळ पाणीपुरवठा योजना नुकतीच मंजूर झाली असून, त्यामुळे या गावाची पाणीटंचाई समस्या कायमची मिटणार आहे़ शासनाने ही कायमस्वरूपी नळयोजना मंजूर केल्याबद्दल गावकऱ्यांतून मोठा आनंद व्यक्त होत आहे़जळकोट तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण लातूर जिल्ह्यात दरवर्षी पाणीटंचाई समस्येला तोंड देणारे एकमेव गाव म्हणजे उमरदरा़ दरवर्षी येथे टँकरने पाणीपुरवठा करावा लागायचा़ टँकर मिळायलाही विलंब लागायचा़ त्यातून हे गाव पुन्हा चर्चेत यायचे़ त्यामुळे उमरदऱ्यासाठी राष्ट्रीय पेयजल योजनेतून कायमस्वरूपी नळयोजना व्हावी, अशी ग्रामस्थ व ग्रामपंचायतीची मागणी होती़ त्यावरून ग्राम पंचायतीच्या मागणीनुसार तालुका व जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांनी राष्ट्रीय पेयजल योजनेतून नळयोजना मंजूर करण्याचा प्रस्ताव योग्य त्या शिफारसींसह राज्य शासनाला पाठविला होता़ गावकऱ्यांची निकड लक्षात घेऊन पाणीपुरवठामंत्री दिलीप सोपल यांनी ६८ लाखांची योजना मंजूर केली आहे़ (वार्ताहर)या नळयोजनेचे काम आता तात्काळ सुरु होणार असून, पाणीटंचाईमुळे गावकऱ्यांचे दरवर्षी होणारे हाल थांबणार आहेत़ उमरदऱ्याचे सरपंच काशिनाथ काळे यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याने ही नळयोजना मंजूर झाली आहे़ पाणीपुरवठ्याची कायमस्वरूपी व्यवस्था उपलब्ध होणार असल्याने गावकऱ्यांकडून आनंद व्यक्त होत आहे़