शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

वाळूज महानगरात ६५० बालकामगार सापडले, केंद्रीय सर्वेक्षणातून  मिळाली माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 13:29 IST

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पांतर्गत बहुजन जाती-जमाती कामगार सेवाभावी संस्थेतर्फे वाळूज महानगरात बालकामगारांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे.

ठळक मुद्देकेंद्रीय श्रम-रोजगार मंत्रालयाच्या राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पांतर्गत बालकामगारांचा सर्व्हे केला जात आहे.

 वाळूज महानगर (औरंगाबाद ) : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पांतर्गत बहुजन जाती-जमाती कामगार सेवाभावी संस्थेतर्फे वाळूज महानगरात बालकामगारांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. या सर्वेक्षणात तीनच दिवसांत तब्बल साडेसहाशे बालकामगार मिळून आल्याने औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांचे धाबे दणाणले आहे.

केंद्रीय श्रम-रोजगार मंत्रालयाच्या राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पांतर्गत बालकामगारांचा सर्व्हे केला जात आहे. या सर्वेक्षणासाठी प्रगणक, समन्वयक व स्थानिक सेवाभावी संस्थांचे पथक तयार करण्यात आले आहे. वाळूज महानगरातील हॉटेल, विविध कार्यालये व औद्योगिक क्षेत्रातील बालकामगारांचा शोध घेतला जात आहे. तीन दिवसांत केलेल्या सर्वेक्षणात वाळूज, पंढरपूर, विटावा, जोगेश्वरी, रांजणगाव, कमळापूर आदी भागांत तब्बल साडेसहाशे बालकामगार काम करीत असल्याचे आढळून आले. या मोहिमेत संजय मिसाळ, कुमार भोरे, अभिजित कुलकर्णी, धनंजय डोमाळे, मतीन शेख, एजाज खान, संतोष हिवराळे आदींचा समावेश आहे. ही मोहीम ७ जूनपर्यंत चालणार असून, त्यानंतर आपला अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर करणार आहेत.

वाळूज औद्योगिक क्षेत्रात अनेक कंपन्यांत व्यवस्थापनाकडून पैशांची बचत करण्यासाठी ठेकेदारामार्फत तोकड्या रोजंदारीवर बालकामगारांकडून काम करून घेतले जाते; मात्र या सर्वेक्षणामुळे बालकामगारांकडून काम करून घेणाऱ्या कंपन्या, कामगार पुरवठा करणाऱ्या ठेकेदारांचे कारवाईच्या भीतीने धाबे दणाणले आहे. 

टॅग्स :WalujवाळूजWaluj MIDCवाळूज एमआयडीसीGovernmentसरकार