शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

जाधववाडीत ६५ लाखांची उलाढाल ठप्प

By admin | Updated: July 13, 2016 00:41 IST

औरंगाबाद : अडत शेतकऱ्यांऐवजी खरेदीदाराकडून घ्यावी, असे अध्यादेश राज्य सरकारने काढले आहेत.

औरंगाबाद : अडत शेतकऱ्यांऐवजी खरेदीदाराकडून घ्यावी, असे अध्यादेश राज्य सरकारने काढले आहेत. याविरोधात मागील शुक्रवारपासून जाधववाडीतील धान्य व फळ-भाजीपाल्याचे अडत व्यवहार बेमुदत बंद ठेवण्यात आले आहेत. परिणामी, दैनंदिन ६५ लाखांची उलाढाल ठप्प झाली आहे. या बंदचा फटका शेतकऱ्यांपासून ते हमालांपर्यंत सर्वांना बसत आहे. जाधववाडीत दररोज सुमारे ८०० पेक्षा अधिक शेतकरी फळे-पालेभाज्या घेऊन येत. मात्र, अडत्यांच्या बंदमुळे मंगळवारी पहाटे सुमारे १०० ते १५० शेतकरी माल घेऊन आले होते. मागील काही दिवसांत पडलेल्या संततधारेमुळे शेतांमध्ये पालेभाज्या खराब झाल्या. त्याचा परिणाम अडत बाजारात पाहण्यास मिळाला. फळभाज्यांची आवक ६० टक्क्यांनी घटली होती. जो शेतीमाल आला, तो उतरून घेण्यास अडत्यांनी नकार दिला. यामुळे शेतकऱ्यांनी परिसरातच उघड्यावर पालेभाजी विक्रीला सुरुवात केली. आवक कमी असल्याने पालेभाज्यांचे भाव दुप्पट झाले होते. शहरातील अन्य भाजी मंडईतील विक्रेते फळभाज्या खरेदीसाठी आले तर त्यांना शेतकऱ्यांना रोख रक्कम द्यावी लागत होती. जुनी उधारी फेडायची व अडत्याकडून नवीन पालेभाज्या उधारीवर घेऊन जाण्याची प्रथा येथे असल्याने अनेक विके्रत्यांनी कमी पैसे सोबत आणले होते. शेतकरी उधारीवर माल देत नसल्याने या विक्रेत्यांनी कमी पालेभाज्या खरेदी केल्या. कारभारी सोनवणे या शेतकऱ्याने सांगितले की, आवक कमी असल्याने टोमॅटोला चांगला भाव मिळाला. पहिले १३ कॅरेट विक्री झाले; पण शिल्लक ७ कॅरेट विकताना दमछाक झाली. आबासाहेब काथार या शेतकऱ्याने सांगितले की, विक्रेत्यांना अडत्याकडून उधारीवर माल घेण्याची सवय असल्याने आम्हाला रोख रक्कम देण्याची त्यांची मानसिकता नाही. कैलास जोगदंडे या शेतकऱ्याने सांगितले की, रोख रक्कम देताना पालेभाज्यांचे भाव विक्रेते पाडून मागत होते. नंतर कमी-जास्त करून आम्ही पालेभाज्या विक्री केल्या.धान्याच्या अडत बाजारातही बेमुदत बंदचा मंगळवारी चौथा दिवस होता. हर्राशी झाली नाही. सर्व अडत व्यापारी गटा-गटाने चर्चा करताना दिसून आले. बाजार समितीचे सचिव विजय शिरसाठ म्हणाले की, अडत व्यवहार बंद असल्याने फळ बाजारात दैनंदिन ४० लाख व धान्य अडत बाजारात २५ लाख असे ६५ लाखांचे व्यवहार ठप्प झाले आहेत.