शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
2
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
3
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
4
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
5
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
6
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
7
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
8
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
9
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
12
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
13
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
14
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
15
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
16
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
17
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
18
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
19
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
20
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."

६४५ जणांनी दिली पोलीस शिपाई पदाची परीक्षा

By admin | Updated: April 16, 2017 23:44 IST

जालना : जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या पोलीस शिपाईच्या ४२ जागांसाठी ६४५ उमेदवारांनी परीक्षा दिली.

जालना : जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या पोलीस शिपाईच्या ४२ जागांसाठी घेण्यात आलेल्या भरती प्रक्रियेत ८०४ उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरले होते. त्यापैकी लेखी परीक्षेस ६४५ उमेदवारांनी परीक्षा दिली. तर १५९ उमेदवार गैरहजर होते. उमेदवारांची रविवारी सकाळी १० ते ११.३० या काळात कडक पोलीस बंदोबस्तात लेखी परीक्षा घेण्यात आली.२२ मार्चपासून या भरती प्रक्रियेला सुरूवात झाली होती. ४२ जागांसाठी साडेपाच हजारांपेक्षा अधिक उमेदवारांनी यासाठी अर्ज केले होते. तर १२ जागा महिलांसाठी सुध्दा राखीव होत्या यासाठी ९०० महिला उमेदवारांनी सुध्दा अर्ज केले होते. उमेदवारांच्या लांबउडी, गोळाफेक, ८०० मीटर धावणे, १०० मीटर आदी मैदानी चाचणी उमेदवारांची घेण्यात आली. त्यात ८०४ उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरले होते. त्यापैकी रविवारी ६४५ उमेदवारांची परीक्षा घेण्यात आली.या पात्र उमेदवार सकाळी ९.३० वाजता कवायत मैदानावर परीक्षेसाठी हजर झाले होते. यावेळी उमेदवारांच्या ओळखपत्राची कसून तपासणी करून १० वाजता परीक्षेला सुरूवात झाली. १० ते ११.३० अशी दीड तास परीक्षा घेण्यात आली. यावेळी पोलीस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह, अप्पर पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर, होम डीवायएसपी अभय देशपांडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी आदी पस्थित होते. (प्रतिनिधी)