जालना : जिल्ह्यात ५६ गटांसाठी तर ११२ गणांसाठी असे ७३६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यात जि.प.साठी २६४ तर पंचायत समितीसाठी ४७२ उमेदवार रिंगणात आहे. गटातून २३४ तर गणातून ४१० असे एकूण ६४४ उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे.जालना तालुक्यातून गटासाठी ५६ तर पंचायत समिती गणासाठी ८६ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहे. त्यामुळे आता गटात ५४ व गणात ८८ उमेदवार निवडणूक रिंग्ांणात आहेत. बदनापूर तालुक्यात ५ गटात २९ तर १० गणात जवळपास ५० उमेदवार रिंगणात आहेत. अंबड तालुक्यात गटात ३३ तर गणात ५७ उमेदवार, मंठा तालुक्यात गटांत २७ व गणात ४९ उमेदवार रिंगणात आहेत. घनसावंगी तालुक्यात होत असलेल्या जि. प.च्या ८ गटासाठी ३२ तर पं.स. १६ गणासाठी ६० उमेदवारी रिंगणात उरले आहेत. परतूर तालुक्यातील पाच जिल्हा परिषद व दहा पंचायत समिती गणासाठी निवडणूक होत आहे. आज अर्ज परत घेण्याच्या शेवटच्या दिवशी गटातील ४९ जणापैकी १९ जणांनी माघार घेतली. पंचायत समिती गणातील ८८ पैकी ४० जणांनी माघार घेतली असून गटात ३० तर गणात ४८ उमेदवार रिंंगणात आहेत. जाफराबाद तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ५ गटात १९ तर पंचायत समितीच्या ९ गणात ३५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. शेवटच्या दिवशी जिल्हा परिषदेच्या पाच गटांतून ३४ तर पंचायत समितीच्या नऊ गणातून ३९ उमेदवारांनी माघार घेतली. आता भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांच्या मध्ये लढती पाहावयास मिळणार आहेत. दोन गटात तिरंगी तर व इतर तीन गटांत चौरंगी व पंचरंगी होणार आहे. भोकरदन तालुक्यात ११ गटांसाठी ४० उमेदवार तर २२ गणासांठी ८० उमेदवार रिंगणात आहेत. गटांतून ३६ तर गणांतून ६५ उमेदवारांनी आपला अर्ज मागे घेतला. अर्ज मागे घेण्यावरून अनेक गट व गणातील उमेदवारांमध्ये वाद झाले. तालुक्यात आता निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून काही गट व गणात भाजप व राष्ट्रवादीच्या उमेदवारांत सरळ लढत होत असल्याचे चित्र स्पष्ट झाले असून दिग्गज उमेदवार या ठिकाणी रिंगणात उभे आहेत.
६४४ उमेदवारांनी घेतली माघार..!
By admin | Updated: February 8, 2017 00:26 IST