लातूर : पंतप्रधान विमा सुरक्षा योजना, प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना, अटल पेन्शन योजनेला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, आतापर्यंत जिल्ह्यातील ६४ हजार ६४० नागरिकांनी या योजनेसाठी खाते उघडले आहे. गेल्या आठ दिवसांत आकडा ६४ हजारांवर गेला आहे. परिणामी, जिल्ह्यातील २३ बँकांत या योजनेसाठी ग्राहकांची गर्दी आहे.केंद्र सरकारने प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजना, प्रधानमंत्री जीनवज्योती विमा योजना व अटल पेन्शन योजना या तिन्ही लोकाभिमुख योजना सुरू केल्या आहेत़ या योजनेचे प्रत्येक जिल्ह्याप्रमाणे लातुरातील भालचंद्र ब्लड बँकेच्या सभागृहात भाजपाचे खासदार सुनील गायकवाड, जिल्हाधिकारी डॉ़ पांडुरंग पोले, एस़बी़आयचे महाप्रबंधक रघुनाथ लोटे, अरूण महाजन यांंच्या उपस्थितीत नुकतेच उद्घाटन करण्यात आले आहे़या तीनही विमा योजना सर्वसामान्य नागरिकांसाठी किफायतशीर व लाभदायक आहेत़ यामध्ये प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत १८ ते ७० वयोगटांतील नागरिकाला २५ मेपर्यंत आधार प्रत व १२ रूपये प्रिमियम भरून सहभागी होता येणार असल्याने या योजनेला नागरिकांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे़ या योजनेअंतर्गत ४१ हजार ५३२ नागरिकांनी बँकेत जावून आपापले खाते काढून १२ रूपयांचा प्रिमियम भरला आहे़ योजनेत सहभागी नागरिकाला वर्षभरात २ लाखाचे अपघाती विमा संरक्षण, अपघातामुळे मृत्यू झाल्यास किंगा पूर्ण अपंगत्व आल्यास २ लाख रूपये व अपघातामुळे अर्ध अपंगत्व आल्यास १ लाखाचे विमा सरंक्षण मिळणार आहे़प्रधानमंत्री जीवनज्योती बिमा योजनेत ३३० रूपाचा प्रिमियम भरून लाभ नागरिकाला घेता येणार आहे़ १८ ते ५० वयोगटांतील नागरिकांना बँकेत खाते काढून आधार क्रमांक देवून या बिमा योजनेत सहभागी होता येणार आहे़ (प्रतिनिधी)भारत सरकारच्या वतीने प्रधानमंत्री जीवनज्योत बीमा योजना, अटल पेन्शन विमा योजना व प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजना या तीन योजना ९ मे रोजी सुरू केल्या आहेत़ यामध्ये सर्वसामान्याला किफायतशीर व लाभदायक असलेल्या प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजना या मोहिमेअंतर्गत वार्षिक प्रिमीयम फक्त १२ रूपये व त्या माध्यमातून मिळणारे लाभ सर्वसामान्यांसाठी लाभदायक व मोठ्या प्रमाणात असल्याने या विमा योजनेला नागरिकांतून उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. या योजनेअंतर्गत आठ दिवसांत ४१ हजार ५९५ नागरिकांनी बँकेत खाते उघडले आहेत.
६४ हजार नागरिकांनी उघडले बँक खाते
By admin | Updated: May 18, 2015 00:19 IST