शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ओलांडली तर निवडणूक रद्दही होऊ शकते; निवडणुकांवरील टांगती तलवार कायम
2
आजचे राशीभविष्य, २६ नोव्हेंबर २०२५: 'या' राशींसाठी आहे धनलाभाचा योग; वाचा आपले आजचे राशीभविष्य!
3
नरिमन पाँईंटवरून थेट विरार...पोहचा एका तासातच सुसाट; उत्तन-विरार सागरी सेतूच्या ‘DPR’ला मान्यता
4
रेड झोन झाला तर बांधकामे बंद होणार; प्रदूषणाचा विळखा कायम, मुंबई महापालिकेचा इशारा
5
असत्यावर सत्य विजय मिळविते याचे भगवा ध्वज हे प्रतीक - पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
मुंबईत ४.३३ लाख दुबार मतदार, महापालिकेची कबुली; म्हणाले, नावे काढण्याचा अधिकार आम्हाला नाही
7
खोटा प्रचार केल्याने वास्तव बदलणार नाही; अरुणाचल प्रदेशावर दावा करणाऱ्या चीनला भारताचे प्रत्युत्तर
8
पतीकडून शारीरिक, मानसिक छळ; सेलिना जेटली हायकोर्टात, ५० कोटींची पोटगी हवी?
9
४ वर्षांची चिमुकली सहा महिन्यांनी पुन्हा आईच्या कुशीत; लेकीला पाहिले अन् आईची शुद्ध हरपली 
10
शेवग्याची शेंग ५०० रुपये किलाेवर; संपूर्ण राज्यात महिनाभर तुटवडा राहणार, कारण काय?
11
वरळीतील ४ प्रभागांत सर्वाधिक दुबार मतदार; उद्धवसेनेच्या नगरसेवकांच्या प्रभागात आढळली दुबार नावे
12
TET Paper Leak: मराठवाड्यातून गोंदियातील शिक्षकांना कॉल, कुणाकडे दीड लाख, कुणाला मागितले तीन लाख रुपये
13
भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या महिला उमेदवाराला दिलासा; छाननीत बाद झालेले १२ अर्ज कोर्टात वैध
14
२६/११ अतिरेकी हल्ल्याला १७ वर्षे पूर्ण; सीएसएमटी स्टेशनवर एकही बॉडी स्कॅनर नाही, सुरक्षा धोक्यात
15
कुजबुज! एकनाथ शिंदेंसमोरच 'उद्धवसाहेब आगे बढो' जयघोष; प्रचारसभेत कार्यकर्तेही पडले गोंधळात
16
तुम्हीही बेडवर लॅपटॉप चालवताय? एक मोठी चूक आणि बसू शकतो हजारोंचा फटका! ताबडतोब वाचा...
17
'...तर देशभरात भाजपचा पाया हादरवून टाकेन', SIR प्रक्रियेवरुन ममता बॅनर्जींचा केंद्रावर हल्लाबोल
18
भेटायला म्हणून गेला अन् भलताच अडकला! गावकऱ्यांनी २ मुलांच्या आईसोबत लावून दिलं तरुणाचं लग्न अन्... 
19
राम मंदिरावर धर्मध्वज डौलानं फडकला, ध्वजावरील ‘ते’ झाड नेमकं कोणतं? इंटरेस्टिंग माहिती...
20
थोडी सभ्यता बाळगा! विमानतळावर पायजमा-स्लिपर घालून येऊ नका! अमेरिकेत निघाला ट्रम्प सरकारचा फतवा
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणला ‘सौभाग्य’चे वावडे; घोषणा केली ६४ हजारांची; कनेक्शन दिले केवळ एक हजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 12:00 IST

आठ महिन्यांमध्ये महावितरणच्या औरंगाबाद परिमंडळाने निश्चित केलेल्या ६४ हजार ५३० कुटुंबांपैकी अवघ्या १ हजार कुटुंबांच्याच घरापर्यंत वीज पोहोचू शकली.

ठळक मुद्दे दारिद्र्य रेषेवरील गरीब कुटुंबांना ५०० रुपयांत वीज देण्याची ‘सौभाग्य योजना’ ही सप्टेंबर २०१७ मध्ये अंमलात आली. दारिद्र्य रेषेवरील गरीब कुटुंबांना ५०० रुपयांत वीज देण्याची ‘सौभाग्य योजना’ ही सप्टेंबर २०१७ मध्ये अंमलात आली.

- विजय सरवदे  

औरंगाबाद : गरिबांच्या घरातील अंधार दूर करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘सौभाग्य योजना’ आणली खरी; पण गेल्या आठ महिन्यांमध्ये महावितरणच्या औरंगाबाद परिमंडळाने निश्चित केलेल्या ६४ हजार ५३० कुटुंबांपैकी अवघ्या १ हजार कुटुंबांच्याच घरापर्यंत वीज पोहोचू शकली. यामुळे गरिबांना वीज देण्याची महावितरणची घोषणा पोकळ ठरली आहे. 

दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना मोफत वीज आणि दारिद्र्य रेषेवरील गरीब कुटुंबांना ५०० रुपयांत वीज देण्याची ‘सौभाग्य योजना’ ही सप्टेंबर २०१७ मध्ये अंमलात आली. तत्पूर्वी औरंगाबाद परिमंडळांतर्गत औरंगाबाद व जालना जिल्ह्यांमध्ये ज्यांच्या घरी अद्यापपर्यंतही वीज पोहोचलेली नाही, अशा दारिद्र्यरेषेखालील आणि रेषेवरील दोन्ही कुटुंबांचे सर्वेक्षण सहायक व शाखा अभियंत्यांमार्फत करण्यात आले. यामध्ये दारिद्र्य रेषेवरील गरीब कुटुंबांना ५०० रुपयांत वीज देण्याची ‘सौभाग्य योजना’ ही सप्टेंबर २०१७ मध्ये अंमलात आली.

यापैकी औरंगाबाद जिल्ह्यात दारिद्र्यरेषेखालील १ हजार ४६१ कुटुंबांपैकी आतापर्यंत अवघ्या ७० कुटुंबांना मोफत वीज कनेक्शन देण्यात आले, तर दारिद्र्य रेषेवरील निश्चित करण्यात आलेल्या २६ हजार ७२८ कुटुंबांपैकी आतापर्यंत ६८० कुटुंबांना वीज कनेक्शन देण्यात आले आहे. जालना जिल्ह्यात निश्चित करण्यात आलेल्या दारिद्र्यरेषेखालील ९ हजार १०३ कुटुंबांपैकी आतापर्यंत २५० कुटुंबांना मोफत वीज कनेक्शन देण्यात महावितरणला यश आले आहे. या जिल्ह्यात निश्चित करण्यात आलेल्या दारिद्र्य रेषेवरील २७ हजार २३८ कुटुंबांपैकी एकालाही कनेक्शन देण्यात आलेले नाही. 

योजनेसाठी वीज बिलाच्या थकबाकीमुळे ज्यांचा कायमचा वीजपुरवठा खंडित करण्यात आलेला आहे, तात्पुरत्या शिबिरातील स्थलांतरित होऊ शकणारी कुटुंबे तसेच शेतवस्त्यांवरील घरे ही पात्र राहणार नाहीत. या योजनेच्या लाभार्थ्यांना वीज जोडणीच्या वेळी मीटरसोबत घरातील अंतर्गत वायरिंगसह एक चार्जिंग पॉइंट, एक एलईडी बल्ब मोफत देण्यात येणार आहे. अतिदुर्गम भागात ज्याठिकाणी विजेचे कनेक्शन देणे शक्य नाही, अशा घरांना सौरऊर्जा संचामार्फत वीजपुरवठा करण्यात येणार आहे. अशा लाभार्थ्यांना अंतर्गत वायरिंगसह एक डीसी पंखा, पाच एलईडी बल्ब आणि एक डीसी चार्जिंग पॉइंट मोफत देण्यात येणार आहे. पंतप्रधान आवास योजना, शबरी योजना, रमाई योजना, आदिम योजना व इतर योजनांच्या घरांनासुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना मोफत वीज जोडणी, तर दारिद्र्य रेषेवरील कुटुंबांना ५०० रुपयांमध्ये वीज जोडणी दिली जाणार आहे. या लाभार्थ्यांना ही रक्कम रोख स्वरुपात न भरता वीज बिलासोबत सलग दहा टप्प्यांमध्ये ती भरण्याची सवलत देण्यात आली आहे.

‘डेडलाईन’ आॅगस्ट २०१८यासंदर्भात महावितरणचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर म्हणाले की, आठ महिन्यांत कामामध्ये संथगती होती; पण यापुढे वीज कनेक्शन देण्यासाठी गती घेतली जाईल. कंत्राटदारांसोबत महावितरणचे कर्मचारीही वीज कनेक्शन देण्यासाठी जुंपले जातील. सप्टेंबर २०१७ मध्ये अंमलात आलेल्या या योजनेची ‘डेडलाईन’ ही आॅगस्ट २०१८ आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणgovernment schemeसरकारी योजनाelectricityवीज