शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

‘समृद्धी’साठी हेक्टरी ६४ लाख !

By admin | Updated: June 18, 2017 00:47 IST

जालना : भाजप सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्यांकडून खाजगी वाटाघाटीद्वारे जमीन खरेदीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे

बाबासाहेब म्हस्के । लोकमत न्यूज नेटवर्कजालना : भाजप सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्यांकडून खाजगी वाटाघाटीद्वारे जमीन खरेदीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. महामार्गासाठी जिल्ह्यात संपादित होणाऱ्या जमिनीचा मोबदला ठरविण्यासाठी स्थापन केलेल्या समितीने कोरडवाहू, हंगामी बागायती व बागायती जमिनीचे दर निश्चित केले आहेत. त्यानुसार १७ गावांतील शेतकऱ्यांना हेक्टरी सरासरी २५ ते ६४ लाख रुपये मोबदला मिळणार आहेत.जालना व बदनापूर तालुक्यातील २५ गावांमधून ४२ किलोमीटरवरून समृद्धी महामार्ग जाणार असून, त्यासाठी ५१२.२८ हेक्टर जमिनींचे संपादन होणार आहे. पैकी ५०१.११ हेक्टर जमिनीच्या संयुक्त मोजणीचे काम पूर्ण झाले आहे. लँड पुलिंग मॉडेलला होणारा विरोध पाहता शासनाने आता थेट वाटाघाटीद्वारे शेतकऱ्यांकडून जमिनी खरेदी करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी जिल्हास्तरीय मोबदला निश्चिती समितीने जमिनीच्या महसूल आकारणीनुसार चार वेगवेगळे भाग पाडले आहेत. जिरायती, हंगामी बागायती व बागायती जमिनीच्या पायाभूत दरांचा अभ्यास करण्यात आला आहे. त्याचबरोबर ज्या गावांमधील जमीन संपादित होणार आहे, तेथील तीन वर्षांतील जमीन खरेदी-विक्री व्यवहारांच्या सरासरी पाचपट दर शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. समितीने ठरविलेल्या दरास संमती असणाऱ्या शेतकऱ्यांना विहित नमुन्यातील संमतीपत्र तलाठी, उपविभागीय अधिकारी किंवा संवादकांमार्फत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या शिबीर कार्यालयात जमा करता येणार आहेत.