लोकमत न्यूज नेटवर्कपैठण : जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने उघडीप दिली असून, यामुळे धरणात येणारी आवक कालपासून घटत असून, बुधवारी (दि.२३) सायंकाळी धरणात १३३३३ क्युसेक्स क्षमतेने आवक सुरू होती. दरम्यान, धरणाचा जलसाठा ६३.०४% एवढा झाला होता.१५२२ फूट जलक्षमता असलेल्या नाथसागराची पाणीपातळी १५१४.५६ फुटांपर्यंत गेली असून, धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी आणखी ७.५ (साडेसात) फूट पाणी लागणार आहे. धरणात एकूण जलसाठा २१०६.८२६ दलघमी, तर उपयुक्त जलसाठा १३६८.७२० दलघमी एवढा झाला आहे. मोठ्या पावसाचे दिवस अद्याप बाकी असल्याने यंदा जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची अपेक्षा जायकवाडी धरण अभियंता अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली.
जायकवाडीत ६३.४% पाणीसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 01:11 IST