शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

शहरात ६२ फिक्स पॉइंट; पेट्रोलिंगसाठी विशेष पथके तैनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:04 IST

औरंगाबाद : लॉकडाऊनमध्ये शहरात कडक पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. पोलीस विभागासह, राज्य राखीव पोलीस दल आणि होमगार्ड यांचीही ...

औरंगाबाद : लॉकडाऊनमध्ये शहरात कडक पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. पोलीस विभागासह, राज्य राखीव पोलीस दल आणि होमगार्ड यांचीही नियुक्ती करण्यात आली असून, ठिकठिकाणी ६२ फिक्स पॉइंट लावण्यात येणार आहेत.

औरंगाबाद शहरात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत असल्यामुळे स्थानिक प्रशासनाने लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. यासाठी शहरातील १७ पोलीस ठाण्यांतर्गत चौकाचौकांत फिक्स पॉइंट लावण्यात येणार आहेत. प्रत्येक फिक्स पॉइंटवर सकाळी ८ ते रात्री ८ या दरम्यान आठ कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. शिवाय रात्रीच्या वेळी या पॉइंटवर ४ पोलीस कर्मचारी आणि अमलदार तैनात असतील. त्यानुसार सिटीचौक ७, जिन्सी ६, सिडको आणि जवाहरनगर प्रत्येकी ५ , क्रांतीचौक, एमआयडीसी वाळूज, एमआयडीसी सिडको आणि बेगमपुरा प्रत्येकी ४, वेदांतनगर, छावणी, वाळूज, दौलताबाद, मुकुंदवाडी, पुंडलिकनगर, आणि उस्मानपुरा प्रत्येकी ३, हर्सूल आणि सातारा येथे प्रत्येकी दोन ठिकाणी पॉइंट लावण्यात येणार आहेत. या बंदोबस्तासाठी एकूण २६९ होमगार्डची नियुक्ती करण्यात येणार आहे.

या फिक्स पॉइंटवर बॅरिकेडस्‌ लावण्यात येणार आहेत. शिवाय विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे. याशिवाय पेट्रोलिंग करण्यासाठी विशेष टीम तयार करण्यात आली आहे. यासाठी ८ पथके तयार करण्यात आली आहेत. ही पथके त्यांना दिलेल्या कार्यक्षेत्रात पेट्रोलिंग करणार आहेत. याशिवाय मोटारसायकल पेट्रोलिंग करण्यासाठी दोन पथके तयार करण्यात आले असून, यासाठी दिवसा ३४ आणि रात्री ३४, असे कर्मचारी नेमण्यात आले आहेत.

फिक्स पॉइंट पेट्रोलिंगसाठी नेमण्यात आलेल्या पथकांना चोऱ्या, घरफोडी होणार नाहीत याचीही दक्षता घेण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले आहेत.