जालना : जिल्ह्यात पाचही विधानसभा मतदारसंघात एकूण ७७ पैकी ६२ उमेदवारांच्या अनामत रक्कमा जप्त झाल्या आहेत. यात शिवसेनेच्या एका माजी आमदारासह याच पक्षाचा अन्य एक, काँग्रेसचे ३, मनसे व बसपाचे प्रत्येकी ४ तसेच राकाँच्या २ उमेदवारांचा समावेश आहे. जिल्ह्यात सरासरी ६९. ३३ टक्के मतदान झाले. यामध्ये घनसावंगी मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे ७५.३५ टक्के मतदानाची नोंद होती. तर जालना मतदारसंघात सर्वात कमी म्हणजे ६०.१० टक्के नोंद होती. मतदारसंघात एकूण झालेल्या मतदानाच्या एक षष्ठांशपेक्षा कमी मते ज्यांना मिळाली, त्यांची अनामत रक्कम जप्त होते. जालना मतदारसंघात १३ उमेदवारांच्या अनामत रक्कमा जप्त झाल्या. यामध्ये रवि राऊत (मनसे), खुशालसिंह ठाकूर (राष्ट्रवादी काँग्रेस), संदीप खरात, ज्ञानेश्वर वाघ, ज्ञानेश्वर नाडे, दादाराव लहाने, फारूख खान, कैलास घोरपडे (सर्व अपक्ष), धनसिंह सूर्यवंशी (अ.भा.हि.म.), बळीराम कोलते (वर्कर्स पार्टी), सुदाम बनसोडे (ब.मु.पा.), खालेद चाऊस (भारिप), फेरोजखान (नॅ.लो.पा.) यांचा समावेश आहे. घनसावंंगी मतदारसंघात सुनील आर्दड (मनसे), संजय लाखे पाटील (काँग्रेस), दिनकर उघडे (हि.ज.पा.), इरफान कॅप्टन (बसपा), मुन्नेमाणिक किशोर, चौंडेकर महेंद्र, शेख खुर्शिद अ. गुलाम, शेषराव जाधव, गाढे अरूण (सर्व अपक्ष), देवीदास कोल्हे (भारिप), सुनील जाधव (ब.मु.पा.) यांचा समावेश आहे. भोकरदन मतदारसंघात सुरेश गवळी (काँग्रेस), पठाण शफीकखाँ (अपक्ष), गौतम म्हस्के (बसपा), दिलीप वाघ (मनसे), एल.के. दळवी (अपक्ष), किसन बोर्डे (रि.ब.से.), प्रकाश सूरडकर (अपक्ष), दीपक बोराडे (वर्कर्स पार्टी), शिवाजी इंगळे (अपक्ष), महादू सूरडकर (अपक्ष), बाबासाहेब पाटील (अपक्ष), मिलिंद डिघे (अपक्ष), फकिरा सिरसाठ (आं.पा.ई), विलास बोरडे (अपक्ष), काशिनाथ पाटील (अपक्ष) यांचा समावेश आहे. बदनापूर मतदारसंघात संतोष सांबरे (शिवसेना), सुभाष मगरे (काँग्रेस), ज्ञानेश्वर गायकवाड (मनसे), शिवाजी आदमाने (रि.से.), विश्वजीत साळवे (बसपा), गणेशदादा खरात (अपक्ष), राजेश राऊत (अपक्ष), ज्ञानेश्वर कुरील (अपक्ष), दिलीप रोकडे (अपक्ष), अरूण जाधव (ब.मु.पा.), तुकाराम हिवराळे (भारिप), ईश्वर बिल्लोरे (अ.भा.हि.म.), सर्जेराव जाधव (अपक्ष) यांचा समावेश आहे. परतूर मतदारसंघात निवास चव्हाण (अपक्ष), सोमनाथ साखरे (शिवसेना), राजेश सरकटे (रा.काँ.), मारोती खंदारे (कम्युनिस्ट पार्टी), रामराव राठोड (भारिप), रतन डावरे (क़पा.ई.), विजय वेढेकर (बसपा), अकबरखाँ बनेखाँ (स.पा.), भगवान पाटोळे (अपक्ष) यांचा समावेश आहे.
६२ उमेदवारांचे डिपॉजिट जप्त
By admin | Updated: October 21, 2014 00:56 IST