शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

६० टक्के नागरिकांनी दाखल केले आक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 01:02 IST

परभणी : वाढीव घरपट्टीच्या अनुषंगाने शहरातील मालमत्ताधारकांना महापालिकेने नोटीस दिल्या आहेत. आतापर्यंत वाटप झालेल्या नोटिसीपैकी सुमारे ६० टक्के नागरिकांनी या नोटिसांवर आक्षेप नोंदवत कर वाढीलाच विरोध केला आहे.

ठळक मुद्दे महानगरपालिकेने केले शहरातील मालमत्तांचे सर्व्हेक्षण आणि फेरमूल्यांकनघरपट्टी दिल्यानंतर प्रत्येक मालमत्ताधारकाला त्याचे म्हणणे मांडण्यासाठी संधी

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : वाढीव घरपट्टीच्या अनुषंगाने शहरातील मालमत्ताधारकांना महापालिकेने नोटीस दिल्या आहेत. आतापर्यंत वाटप झालेल्या नोटिसीपैकी सुमारे ६० टक्के नागरिकांनी या नोटिसांवर आक्षेप नोंदवत कर वाढीलाच विरोध केला आहे.परभणी शहरातील मालमत्ताधारकांकडून महापालिका घरपट्टी वसूल करते. प्रत्येक १५ वर्षानंतर मालमत्तांचे पूनर्मूल्यांकन करणे अपेक्षित असते. परंतु, परभणी शहरात हे मूल्यांकन झाले नसल्याने महापालिकेला आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत होते. दरम्यान, मागील वर्षी महानगरपालिकेने शहरातील मालमत्तांचे सर्व्हेक्षण आणि फेरमूल्यांकन पूर्ण केले आहे. या फेरमूल्यांकनाच्या आधारे शहरातील मालमत्ताधारकांना नवीन करानुसार घरपट्टी दिली जात असून त्यात वाढीव बांधकामाचीही नोंद केली जात आहे. घरपट्टी दिल्यानंतर प्रत्येक मालमत्ताधारकाला त्याचे म्हणणे मांडण्यासाठी संधी दिली जात आहे. परभणी शहरामध्ये ४५ हजार मालमत्ता असून आतापर्यंत सुमारे १२ हजार २२८ नागरिकांना या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यापैकी जवळपास सुमारे ३ ते ४ हजार नागरिकांनी महापालिकेकडे आक्षेप नोंदविले आहेत. महापालिकेने बजावलेली घरपट्टी मान्य नसल्याचे या नागरिकांनी मनपाला कळविले आहे. दरम्यान, या सर्व नागरिकांचे आक्षेप नोंद केले जात असून त्यांची प्रत्यक्ष सुनावणी घेतली जाणार आहे.शहरामध्ये तीन प्रभाग समितीनिहाय नागरिकांना नोटीस बजावल्या आहेत. आतापर्यंत प्रभाग समिती अ मध्ये ५ हजार, ब मध्ये ४ हजार २२८ तर क मध्ये ३ हजार नागरिकांना अशा नोटीस बजावण्यात आल्या आहेत. महापालिकेने लावलेला कर हा पूर्वीच्या कराच्या तुलनेत अधिक असल्यामुळे आक्षेप नोंदविणाºयांची संख्याही वाढली आहे. ३ हजार आक्षेप महापालिकेकडे दाखल झाले असून यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.