शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
7
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
8
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
9
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
10
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
11
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
13
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
14
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
15
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
16
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
17
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
18
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
19
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
20
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO

गतवर्षीच्या तुलनेत यंदा ५८४ मि.मी.कमी पाऊस

By admin | Updated: August 10, 2014 02:23 IST

नांदेड : पावसाळा सुरु होऊन अडीच महिन्याचा कालावधी संपला तरी अद्याप समाधानकारक पाऊस पडला नाही. गतवर्षीच्या तुलनेत यंदा सरासरी ५

नांदेड : पावसाळा सुरु होऊन अडीच महिन्याचा कालावधी संपला तरी अद्याप समाधानकारक पाऊस पडला नाही. गतवर्षीच्या तुलनेत यंदा सरासरी ५८४ मि.मी.कमी पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यावर कोरड्या दुष्काळाचे सावट ओढावले आहे. गतवर्षी १ जून २०१३ ते ८ आॅगस्ट २०१३ या कालावधीत जिल्ह्यात सरासरी ७३९.५८ मि.मी.पाऊस पडला होता. तर यावर्षी ८ आॅगस्टपर्यंत सरासरी केवळ १५४.९५ मि.मी.एवढा पाऊस झाला आहे. यामुळे जिल्ह्यात पाण्याचा प्रश्न गंभीर होत असून जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही भेडसावत आहे. सन २०१२ मध्ये ८ आॅगस्टपर्यंत ३३५.९७ मि.मी.पाऊस झाला होता. जिल्ह्यात १ जून ते ३१ आॅक्टोबर पर्यंत जिल्ह्यात सरासरी वार्षक ९५५.५५ मि.मी.पाऊस पडतो. परंतु यंदा यापैकी २५ टक्केही पाऊस आजपर्यंत पडलेला नाही.जिल्ह्यात ८ आॅगस्टपर्यंत या वर्षात तालुकानिहाय पडलेला पाऊस असा- नांदेड १६९.९८ मि.मी., मुदखेड १२९ मि.मी., अर्धापूर १५३.३५ मि.मी., भोकर १७६.९५ मि.मी., उमरी १६२.७३, कंधार १२०.२१ मि.मी., लोहा १५०.८३, किनवट १८५.५६, माहूर २००.८७, हदगांव १३६.८४, हिमायतनगर १३६.७१, देगलूर १४०.५१, बिलोली १२६.८०, धर्माबाद १७०.३३, नायगांव १४२.४० मि.मी. तर मुखेड तालुक्यात १७६.१० मि.मी.असा ८ आॅगस्टपर्यंत एकूण २४७९.२७ मि.मी. ऐवढा तर सरासरीच्या १५४.९५ मि.मी.पाऊस पडला आहे. एकूण टक्केवारीच्या १६.२२ मि.मी.ऐवढा पाऊस झाला आहे. गतवर्षी २०१३ मध्ये नांदेड तालुका ७३५.८१ मि.मी., मुदखेड ६९४.९८ मि.मी., अर्धापूर ६६२.६२, भोकर ९२२.०८, उमरी ६७०.४१, कंधार ५४२.८०, लोहा ५१३.६४, किनवट ९६३ मि.मी., माहूर १२२५.७०, हदगांव ९०७.१३, हिमायतनगर ९८४.९४, देगलूर ५७१.१८, बिलोली ६३८.६०, धर्माबाद ५६८.६६, नायगांव ५२४.६०, मुखेड ७०७.११ असा एकूण ११८३३.२९ मि.मी.ऐवढा पाऊस पडला होता. (प्रतिनिधी)