शहरं
Join us  
Trending Stories
1
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
2
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
3
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
4
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
5
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
6
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
7
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
9
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
10
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
11
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
12
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
13
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
14
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
15
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
16
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
17
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
18
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
19
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
20
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी

‘अमृत’ची ५७ कोटींची निविदा मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 00:38 IST

येथील महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सोमवारी झालेल्या बैठकीत अमृत अभियानांतर्गत पाणीपुरवठा योजनेच्या ५७ कोटी ४२ लाख ५ हजार ९३२ रुपयांच्या कामाच्या निविदेस मंजुरी देण्यात आली. त्यामुळे या योजनेअंतर्गत शहरात पाणीपुरवठ्याची कामे मार्गी लागतील, असा सत्ताधाºयांना विश्वास वाटत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सोमवारी झालेल्या बैठकीत अमृत अभियानांतर्गत पाणीपुरवठा योजनेच्या ५७ कोटी ४२ लाख ५ हजार ९३२ रुपयांच्या कामाच्या निविदेस मंजुरी देण्यात आली. त्यामुळे या योजनेअंतर्गत शहरात पाणीपुरवठ्याची कामे मार्गी लागतील, असा सत्ताधाºयांना विश्वास वाटत आहे.महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे सभापती गणेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी पालिकेच्या बी.रघुनाथ सभागृहात समितीची बैठक झाली. यावेळी मनपा आयुक्त राहुल रेखावार, नगरसचिव मुकूंद कुलकर्णी यांच्यासह समितीचे सदस्य व अधिकाºयांची उपस्थिती होती. यावेळी अमृत अभियानांतर्गत परभणी शहरासाठी मंजूर झालेल्या पाणीपुरवठा योजनेविषयी चर्चा करण्यात आली. त्यामध्ये या योजनेअंतर्गत ३७ दशलक्ष लिटर क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र बांधणे, शुद्ध पाणी व धरण नलिका पाईपलाईन पुरवठ्यासह अंथरुन चाचणी देणे, २० लक्ष लिटर क्षमतेचे संतुलन जलकुंभ बांधणे, शुद्ध जलयुक्त वाहिनी उभारणे, शहरात ६ जलकुंभ बांधणे आदी कामे करण्यात येणाºया ५७ कोटी ४२ लाख ५ हजार ९३२ रुपयांच्या कामांच्या निविदेस मंजुरी देण्यात आली. हे काम औरंगाबाद येथील विजय कन्स्ट्रक्शन या कंत्राटदाराला देण्यात आले. या विषयावरील झालेल्या चर्चेत सुनील देशमुख, महमद जानू, सचिन अंबिलवादे, इम्रान लाला, मोकिंद खिल्लारे, नंदू दरक, अनिता सोनकांबळे यांनी सहभाग घेतला. यावेळी २०१५-१६ च्या दलित्तोतर विकास योजनेअंतर्गत प्राप्त झालेल्या ४० लाख रुपयांच्या निविदेलाही मंजुरी देण्यात आली. तसेच राष्ट्रीय नागरी उपजीविका योजनेअंतर्गत प्राप्त होणाºया निधी अंतर्गत गंगाखेड रोडवरील साखला प्लॉट भागात जवळपास १ कोटी रुपये खर्च करुन बांधण्यात येणाºया रात्र निवारा इमारत बांधकामासही मंजुरी देण्यात आली.याबाबतचा प्रश्न सुनील देशमुख यांनी उपस्थित केला होता. तसेच प्रभाग क्रमांक ३० मधील वर्मानगर भागात दलितवस्ती सुधार योजनेअंतर्गत २० लाख रुपये निधीतून करण्यात येणाºया कामासही मंजुरी देण्यात आली.