शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा योजनेचा ५४ कोटींचा निधी अखर्चित

By admin | Updated: March 10, 2017 00:27 IST

लातूर : जिल्हा वार्षिक योजनेत अखर्चित निधीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असून, जवळपास ३२ टक्के निधी अखर्चित राहिला आहे़

लातूर : जिल्हा वार्षिक योजनेत अखर्चित निधीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असून, जवळपास ३२ टक्के निधी अखर्चित राहिला आहे़ २०० कोटींपैकी जिल्हा नियोजन विभागाने संबंधित यंत्रणेकडे १७० कोटी रूपये वितरित केले असून, त्यापैकी ११६ कोटींचा खर्च संबंधित यंत्रणांनी केला आहे़ ६८ टक्के खर्च आतापर्यंत झाला असून, ३२ टक्के खर्च अद्याप यंत्रणांनी केला नाही़ जिल्हा नियोजन समितीने विविध विकास कामांसाठी कृषी, पशुसंवर्धन, दुग्धशाळा विकास, मत्स्य व्यवसाय विकास, वने व वन्य जीवन, सहकार, मृदा व जलसंधारण, ग्रामीण रोजगार, एकात्मिक ग्रामीण रोजगार, सामान्य शिक्षण, तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण, लोकवाचनालय, क्रीडा व युवक कल्याण, मागासवर्गीय कल्याण योजना, महिला व बालकल्याण, सार्वजनिक आरोग्य, पाणीपुरवठा व स्वच्छता, गृहनिर्माण, नगरविकास, लघु पाटबंधारे, ग्रामीण लघु उद्योग, रस्ते विकास, ग्रामीण रस्ते विकास, रस्ते व पूल, सार्वजनिक बांधकाम आदी विभागांसाठी २०० कोटी रूपये मंजूर करण्यात आले़ त्यापैकी या यंत्रणांना १७० कोटी रूपये वितरित करण्यात आले असून, वर्षभरात या यंत्रणेने ११६ कोटी रूपये खर्च केले आहेत़ उर्वरित ५४ कोटी निधी अखर्चित राहिला आहे़ सहा दिवसांपूर्वी पालकमंत्र्यांनी आढावा बैठक घेऊन अखर्चित निधी तत्काळ खर्च करून विकासाच्या योजना राबविण्याच्या सूचना केल्या होत्या़ यापूर्वीच्याही बैठकीत वेळेत निधी खर्च करण्यासंदर्भात सूचना करण्यात आल्या़ तरीही ५४ कोटी रूपयांचा निधी अखर्चित राहिला आहे़ मार्च अखेर हा निधी खर्च न केल्यास इतर विभागाकडे वर्ग करावा लागतो़