शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

५४ उमेदवार निवडणूक लढविण्यास अपात्र!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 00:55 IST

नगरपालिका प्रशासनाने जालना, अंबड, परतूर, भोकरदन येथील ५४ उमेदवारांना तीन वर्षांकरिता निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविले

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : नगरपालिका निवडणूक लढविणाºया ५४ उमेदवारांना निवडणूक खर्च सादर न करणे चांगलेच महागात पडले आहे. नगरपालिका प्रशासनाने जालना, अंबड, परतूर, भोकरदन येथील ५४ उमेदवारांना तीन वर्षांकरिता निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविले आहे. सोमवारी हा निर्णय घेण्यात आला असून, याबाबत गॅझेटमध्ये नोंद करण्यात आल्याचे वरिष्ठ अधिकाºयांनी सांगितले.मागील वर्षी जालना, परतूर, अंबड व भोकरदन नगरपालिकेच्या निवडणुका घेण्यात आल्या होत्या. नगरसेवकपदाचे स्वप्न पाहणाºया शेकडो उमेदवारांनी या निवडणुकीसाठी अर्ज भरले. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार प्रत्येक उमेदवाराला बँकेत स्वतंत्र खाते उघडून दररोज निवडणूक खर्च सादर करणे बंधनकारक आहे. असे असतानाही काही उमेदवारांनी निवडणूक खर्च सादर केला नाही. खर्च सादर न करणाºया अनेक उमेदवारांना नगरपालिका प्रशासनामार्फत नोटिसा पाठविण्यात आल्या होत्या. त्यानंतर बहुतांश उमेदवारांनी निवडणूक विभागाकडे खर्च सादर केला. मात्र, ५४ उमेदवारांनी वारंवार सूचना देऊनही निवडणूक खर्च सादर करण्यास टाळाटाळ केली. अशा उमेदवारांना नगरपालिका प्रशासनाने निवडणूक विभागाच्या नियमानुसार खर्च सादर न केल्यामुळे आपणास निवडणूक लढविण्यास अपात्र का ठरवू नये, या आशयाची नोटीस पाठवून आपली बाजू मांडण्याचे सांगण्यात आले होते. मात्र, संबंधित उमेदवारांनी याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे नियमांनुसार ५४ उमेदवारांना तीन वर्षांकरिता कुठलीही निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविण्यात आले आहे.