शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘एकनाथ’साठी ५३.८३ टक्के मतदान

By admin | Updated: July 1, 2016 00:32 IST

पैठण : संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी गुरुवारी ५३.८३ टक्के मतदान झाले. १३ हजार ९१३ मतदारांपैकी ७ हजार ४८८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला

पैठण : संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी गुरुवारी ५३.८३ टक्के मतदान झाले. १३ हजार ९१३ मतदारांपैकी ७ हजार ४८८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ७७ मतदार असलेल्या सोसायटी मतदारसंघात १०० टक्के मतदान झाले. गुरुवारी सकाळी ८ वाजता तालुक्यातील ३१ मतदान केंद्रांवर मतदानास सुरुवात झाली. सकाळच्या सत्रात संथगतीने मतदान झाले. मात्र, दुपारी २ वाजेनंतर मतदानाने वेग घेतला. मतदान संपण्याच्या निर्धारित वेळेत एकूण मतदानापैकी ७ हजार ४८८ मतदारांनी मतदान केले. निवडणुकीत आमदार संदीपान भुमरे यांच्या शेतकरी कामगार विकास पॅनल व भाजप तालुकाध्यक्ष तुषार शिसोदे, माजी आमदार संजय वाघचौरे, माजी चेअरमन अप्पासाहेब रामकृष्ण पाटील यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन पॅनलमध्ये चुरशीची लढत होत आहे. सकाळपासून आमदार संदीपान भुमरे हे आपल्या समर्थकांसह पैठण येथील मतदान केंद्रावर तळ ठोकून होते. त्यांच्या सोबत काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रवींद्र काळे, नगराध्यक्ष दत्ता पा. गोर्डे, विष्णू मिटकर, जिल्हा उपप्रमुख विनोद पा. बोंबले, तालुकाप्रमुख अण्णासाहेब लबडे, नंदलाल काळे, प्रल्हाद औटे, राम एरंडे, श्याम जगताप, तुषार पाटील, शहरप्रमुख प्रकाश वानोळे, नाथ पोरवाल, दिलीप मगर, दादा बारे, शिवराज पारीख आदी होते. परिवर्तन पॅनलकडून माजी आमदार संजय वाघचौरे, भाजप तालुकाध्यक्ष तुषार शिसोदे, जितसिंग करकोटक, माजी चेअरमन अप्पासाहेब रामकृष्ण पाटील, उपनगराध्यक्षा रेखाताई कुलकर्णी, रफिक कादरी, आबा बरकसे, सुनील रासणे, हे मतदान करून घेत होते. मतदानाच्या कालावधीत तालुक्यातील कोणत्याही मतदान केंद्रावर अनुचित प्रकार न घडता मतदान शांततेत पार पडले. उद्या शुक्रवारी येथील आशीर्वाद मंगल कार्यालयात सकाळी मतमोजणीस सुरुवात होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे.पैठण - ३१८, आखतवाडा - २२५, वडवाळी - २७८, आनंदपूर - १९९, पिंपळवाडी - ३५६, वाहेगाव - ३६१, चांगतपुरी - २५७, चनकवाडी -१९१, पाटेगाव - २४९, दावरवाडी - १८७, विहामांडवा - ३०४, नवगाव - ३६०, नांदर - १९१, दादेगाव हजारे - २३२, टाकळी अंबड - ३४१, आपेगाव - २५५, कडेठाण - २२२, पाचोड - २३४, आडूळ - १८४, निलजगाव - १७४, चितेगाव - १९५, बिडकीन - १७२, रांजणगाव खुरी - १७०, कौडगाव - १८०, बालानगर- २८०, ढाकेफळ - ३२५, ढोरकीन - ३००, धनगाव - १९५, लोहगाव - २५३, कारकीन - २२३ व सहकारी संस्था प्रतिनिधी मतदारसंघात ७७ पैक ी ७७. पाचोड : संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या आज झालेल्या निवडणुकीत पाचोड परिसरात ८ केंद्रांवर फक्त ४९.४९ % टक्के मतदान झाले आहे. आज सकाळी पाचोड गावासह परिसरातील आडूळ, कडेठाण, टाकळी अंबड, दादेगाव हजारे, नांदर, विहामांडवा, दावरवाडी या गावांत सकाळी शांततेत मतदानास सुरुवात झाली. पैठणचे आ. भुमरे, विलास भुमरे, राजू भुमरे यांनी पाचोड येथे मतदानाचा हक्क बजावला. यानंतर आ. भुमरे यांनी विविध मतदान केंद्रांला भेटी दिल्या. स.पो. अधीक्षक बच्चनसिंह, स.पो.नि. महेश आंधळे यांनी पाचोड परिसरात आठही मतदान केंद्रांना भेटी दिल्या. पाचोड पोलिसांनी सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवला होता. कोठेही अनुचित प्रकार घडला नाही.