शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर हिंदूंसाठी एकही देश शिल्लक राहणार नाही'; मुस्लीम लोकसंख्या वाढीवरून भाजपचा काँग्रेसवर निशाणा
2
BANW vs INDW : भारतीय महिलांनी रचला इतिहास; बांगलादेशला त्यांच्यात घरात ५-० ने नमवले
3
हरियाणातील BJP सरकार कोसळणार? काँग्रेसने केला बहुमताचा दावा, राज्यपालांना लिहिले पत्र...
4
"आम्हाला रस्त्यावर आणून तू विदेशात स्थायिक", पालकांची ४ पानी सुसाईड नोट, डोळ्यात येईल पाणी
5
संजू सॅमसनला बाद ठरवणाऱ्या Controversial  निर्णयाचा नवा Video, अखेर सत्य समोर आलेच... 
6
'सिकंदर' ची घोषणा झाल्यानंतर सलमान-रश्मिकाचा जुना व्हिडिओ व्हायरल, भाईजानचं तेलुगू ऐका!
7
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 
8
'12th Fail' फेम विक्रांत मेसीने टॅक्सी ड्रायव्हरला केली शिवीगाळ? अभिनेत्यावर गंभीर आरोप, व्हिडिओ व्हायरल
9
मोठी बातमी : एक चूक काय झाली, LSG च्या मालकांनी लोकेश राहुलच्या हकालपट्टीची तयारी सुरू केली
10
"निवडणूक प्रचार हा मूलभूत अधिकार नाही", केजरीवाल यांच्या जामीन अर्जाला ईडीचा विरोध
11
विराट कोहलीला पंजाबविरूद्धच्या सामन्यात मोठ्या विक्रमाची संधी; ठरू शकतो पहिलाच भारतीय!
12
मुग्धा गोडसे भडकली, मॉलमधील एका कॅफेत आईला मिळाली वाईट वागणूक; प्रकरण काय?
13
चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी, सुरू आहे Moon Express ची तयारी; NASA थेट रेल्वेच चालवणार!
14
"देशात भाजपा एकटीच 370 पेक्षा जास्त जागा जिंकेल..."; शिवराज सिंह चौहान यांचा मोठा दावा
15
हरियाणामध्ये राजकीय हालचालींना वेग, 'बहुमत चाचणी घ्या', माजी उपमुख्यमंत्र्यांची राज्यपालांकडे मागणी
16
“पराभवाच्या भितीने भांबावल्यानेच नरेंद्र मोदींकडून दररोज असत्य विधाने”; काँग्रेसची टीका
17
राम मंदिराच्या पहिल्या मजल्याचे काम वेगाने सुरु; ‘असा’ असेल राम दरबार, कधी होणार पूर्ण?
18
नफ़रत नहीं, नौकरी चुनो! 'इंडिया'चे सरकार बनतंय; ३० लाख रिक्त सरकारी पदे भरणार : राहुल गांधी
19
"आमचे अणुबॉम्ब कायम सज्ज असतात"; रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची अमेरिकेला खुली धमकी
20
‘पैसे मिळाले नाहीत का तुला? मिळाले नसतील तर...’, भरसभेत अजित पवार यांनी विचारलं आणि...

५२ गावांत साथीच्या आजारांचा उद्रेक

By admin | Published: October 31, 2014 12:11 AM

बीड : केवळ धूर फवारणी करणे म्हणजे साथीच्या आजाराला प्रतिबंध असे होत नाही. यासाठी जाणीव जागृती बरोबरच साथ रोगाचा फैलाव होण्यापूर्वी जिल्ह्यातील अबेटिंग करणे,

बीड : केवळ धूर फवारणी करणे म्हणजे साथीच्या आजाराला प्रतिबंध असे होत नाही. यासाठी जाणीव जागृती बरोबरच साथ रोगाचा फैलाव होण्यापूर्वी जिल्ह्यातील अबेटिंग करणे, स्वच्छतेसाठी उपक्रम राबविणे, आरोग्य यंत्रणा व जिल्हा हिवताप कार्यालय यांनी सतर्क रहाणे आवश्यक आहे. मात्र यापैकी कोणतीही उपाय योजना बीड जिल्हयातील अकरा तालुक्यांमध्ये झालेली नाही. याचाच परिणाम म्हणून जिल्हयात ५२ पेक्षा जास्त गावे तापीने फणफणलेले आहेत. साथ रोगांचा फैलाव झाल्यावर आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले. यामध्ये जिल्हयातील चार जणांचा डेंग्यू चिकुन गुनियाने बळी गेला आहे. जिल्हयातील साथीचे आजार व आरोग्य यंत्रणा यांचा घेतलेला आढावा़अनिल महाजन ल्ल धारूरतालुक्यातील आरोग्य यंत्रणेचा कारभार प्रभारी अधिकाऱ्यांवरच सुरू आहे. तीन ते चार महिन्यापूर्वी साथीचे आजार येऊ नयेत, यासाठी जाणीव जागृती करण्याचे काम होणे आवश्यक होते. मात्र तालुक्यातील आरोग्य विभागाने त्यावेळी दुर्लक्ष केले. परिणामी डेंग्यूमुळे तालुक्यातील सोनीमोहा येथील पुनम लहू तोंडे या ७ वर्ष वयाच्या चिमुकलीचा बळी गेला.तालुक्यातील आरणवाडी, चोरंबा, घागरवडा, सोनीमोहा, धुनकवड, पहाडी पारगाव, काठेवाडी, कचरवाडी, सुरनवाडी, कारी आदी गावांमध्ये मागील अनेक दिवसापासून डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने साथ रोगांनी डोके वर काढले आहे. तालुक्यातील दहा जणांच्या रक्ताचे नुमने तपासणीसाठी पाठविण्यात आलेले आहे. धारूर शहरासह अन्य ठिकाणच्या प्रा. आ. केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे प्रभारी आहेत. याचा परिणाम आरोग्य सेवेवर होत आसल्याचे पहावयास मिळत आहे. भोगलवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी देखील प्रभारी आहेत. यामुळे या भागात मागील दोन महिन्यात साथीच्या आजारांचा फैलाव होऊ नये यासाठी कसलीच उपायोजना झालेली नाही.तालुक्यातील ग्रामीण भागातील ग्रामस्थांना प्राथमिक आरोग्य केंद्रावर दर्जेदार उपचार मिळत नसल्याने खाजगी दवाखान्यांचा सहारा गोर-गरीब रूग्णांना घ्यावा लागत आहे.विलास भोसले ल्ल पाटोदातालुक्यातील सहा रूग्णांचे रक्त नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे दिले होते. यामध्ये सहा पैकी चार जणांना डेंग्यूची लागण झाली असल्याचे समोर आले आहे. लागण झालेले रूग्ण करंजवन, येवलवाडी, पाटोदा व सोनेगांव येथील रहिवाशी आहेत. पाटोदा तालुक्यात चार प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. यामध्ये आमळनेर, वाहली, नायगाव व डोंगरकिन्हीचा समावेश आहे. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रावर दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे मंजूर आहेत. परंतु पाटोदा तालुक्यातील चारही प्राथमिक आरोग्य केंद्रावर प्रत्येक एक वैद्यकीय अधिकाऱ्याचे पद मागील अनेक महिन्यांपासून रिक्त आहेत. यामुळे ग्रामीण भागातील जनतेला चांगली आरोग्य सेवा मिळत नसल्याची तक्रार तालुक्यातील ग्रामस्थांनी केली आहे़