जालना : जिल्हा परिषदेच्या ५६ आणि पंचायत समितीच्या ११२ गणांची ५ आॅक्टोबर रोजी काढण्यात आलेल्या सोडतीवर जिल्ह्यातून ५१ आक्षेप जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सामान्य प्रशासन विभागाला प्राप्त झाले आहेत.जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाकडून नव्याने निवडणुकीसाठी प्रभाग रचना करण्यात आली आहे. यावर ५ आक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, उपजिल्हाधिकारी डॉ. एन. आर. शेळके आणि सामान्य प्रशासनाच्या नायब तहसीलदार भालेराव यांच्या उपस्थितीत सोडत काढण्यात आली होती. काढण्यात आलेल्या सोडतीत अनेक दिग्गज सदस्यांचे गण आणि गटात बदल झाल्याने अनेकांना सुखद धक्का दिला. काढण्यात आलेल्या सोडतीवर आक्षेप घेण्यासाठी १० ते २० आक्टोंबर पर्यंत आक्षेप नोंदविण्याचे आवाहन निवडणूक विभागाकडून करण्यात आले. दहा दिवसांत कार्यालयाकडे आठही तालुक्यांतून ५१ प्रस्ताव विभागाकडे प्राप्त झाले आहेत. त्यात सर्वाधिक आक्षेपाचे प्रस्ताव भोकरदन तालुक्यातून २४ प्रस्ताव जाफराबाद तालुक्यातून १०, जालना ६, मंठा आणि घनसावंगी ४, आणि बदनापूर परतूर तालुक्यातून प्रत्येकी १ प्रस्ताव आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सामान्य विभागाकडून देण्यात आली आहे. (प्रतिनिधी)आलेल्या ५१ प्रस्तावांवर २७ आक्टोबर रोजी विभागीय आयुक्त कार्यालय येथे सुनावणी होणार आहे.
जि.प.,पं.स साठी ५१ आक्षेप दाखल
By admin | Updated: October 22, 2016 00:28 IST