शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यातील धरणांमध्ये ५०.५ टक्के साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 19:12 IST

गेल्या काही दिवसांत झालेल्या दमदार पावसामुळे मराठवाड्यातील धरणांमध्ये सध्या ५०.५ टक्के इतका पाणीसाठा आहे.  राज्यातील काही जिल्हे वगळता बहुतांश भागात चांगला पाऊस पडल्यामुळे धरणांच्या साठ्यात समाधानकारक वाढ झाली आहे.

ठळक मुद्दे गेल्यावर्षी याच सुमारास ८५ टक्के पाऊस झाला होता, तर धरणांमध्ये ६८ टक्के साठा होताराज्यातील ३१२ गावे आणि १५०४ वाड्यांना सध्या ३०२ टँकरमार्फत पाणीपुरवठा 

औरंगाबाद : गेल्या काही दिवसांत झालेल्या दमदार पावसामुळे मराठवाड्यातील धरणांमध्ये सध्या ५०.५ टक्के इतका पाणीसाठा आहे.  राज्यातील काही जिल्हे वगळता बहुतांश भागात चांगला पाऊस पडल्यामुळे धरणांच्या साठ्यात समाधानकारक वाढ झाली आहे. जूनपासून आतापर्यंत झालेल्या सरासरीच्या ७८ टक्के पावसामुळे धरणांमध्ये एकूण ६७ टक्के पाणीसाठा निर्माण झाला आहे. गेल्यावर्षी याच सुमारास ८५ टक्के पाऊस झाला होता, तर धरणांमध्ये ६८ टक्के साठा होता.  राज्यात १ जून ते ११ सप्टेंबर अखेरपर्यंत ७८७.१ मि. मी. इतका पाऊस झाला. हा पाऊस सरासरीच्या ७७.९ टक्के एवढा आहे. गेल्या वर्षी याच सुमारास तो सरासरीच्या ८५.४ टक्के एवढा झाला होता. सरासरीच्या तुलनेत प्रत्यक्ष पडलेल्या पावसानुसार जिल्ह्याची वर्गवारी अशी आहे: बीड, उस्मानाबाद, अहमदनगर, रायगड, पालघर, ठाणे, पुणे या सात जिल्ह्यांत १०० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला. जालना, लातूर, बुलडाणा, नागपूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, नंदुरबार, सोलापूर, सातारा, सांगली या बारा जिल्ह्यांत ७६ ते १०० टक्के पाऊस पडला. औरंगाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली, जळगाव, कोल्हापूर, अकोला, वाशिम, अमरावती, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या चौदा जिल्ह्यांत ५१ ते ७५ टक्के पाऊस पडला. यवतमाळ या एका जिल्ह्यात २६ ते ५० टक्के पावसाची नोंद झाली आहे. राज्यातील ३१२ गावे आणि १५०४ वाड्यांना सध्या ३०२ टँकरमार्फत पाणीपुरवठा सुरु आहे. गेल्या वर्षी याच दिवसात १४४ गावे आणि ६८० वाड्यांसाठी २०४ टँकर्स सुरु होते. प्रामुख्याने औरंगाबाद, बुलडाणा, अहमदनगर, जळगाव, धुळे, नाशिक, पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांमधील टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.