शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्याला दमनगंगेचे ५० टीएमसी पाणी देऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 00:38 IST

दमनगंगा प्रकल्पाचे ५० टक्के टीएमसी पाणी गोदावरी खोºयात आणण्यासाठी मान्यता मिळाली आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कृष्णा खोºयातून मिळविण्यासाठी शासनाने मान्यता दिली आहे. केंद्र शासनाच्या माध्यमातून दमनगंगा प्रकल्पाचे ५० टक्के टीएमसी पाणी गोदावरी खोºयात आणण्यासाठी तत्त्वत: मान्यता मिळाली आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी मराठवाडा मुक्तिसंग्रामदिनी आयोजित कार्यक्रमात सांगितले.केंद्र शासनाच्या कॅबिनेटसमोर प्रस्ताव मंजूर होताच मराठवाड्याला दमनगंगेचे पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. गोदावरी पात्रात येणाºया त्या पाण्यामुळे मराठवाडा सुजलाम् सुफलाम् होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यानातील स्मृतिस्तंभ येथे हुतात्म्यांना अभिवादन करून ध्वजारोहण केल्यानंतर ते बोलत होते. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, पालकमंत्री रामदास कदम यांच्यासह मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती.मुख्यमंत्री म्हणाले, मराठवाड्यातील धरणांच्या कामांना चालना देण्यात येत आहे. विभागाचा विकास करणे ही राज्य शासनाची भूमिका आहे. हुतात्म्यांच्या त्यागाचा आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदानाचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. पाणी प्रश्न सोडविण्यासाठी वॉटरग्रीड प्रकल्पाचा आराखडा बनविण्याचे काम सुरू आहे. या ग्रीडमुळे मराठवाड्यातील उद्योग, तसेच शेतीला मोठा फायदा होईल.डीएमआयसीतील आॅरिक सिटीमुळे सुमारे ३ लाखांपर्यंत रोजगारनिर्मिती होणार आहे. जलयुक्त शिवार योजनेमुळे साडेचार लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. विभागात अन्न सुरक्षा योजनेत ४० लाख कुटुंबे पात्र ठरली. पंतप्रधान पीक विमा योजनेत ६२ लाख ३६ हजार शेतकºयांनी सहभाग घेतला. त्यातील ५३ लाख शेतकरी मराठवाड्यातील आहेत. पीक विमा योजनेत ८० टक्के शेतकºयांनी सहभाग घेतला. मराठवाडा पीक विम्यात पुढे आहे. कर्जमुक्ती योजनेत शेतकºयांनी नोंदणी केली आहे. आता संघर्ष विकासासाठी करायचा आहे. गरिबी, भ्रष्टाचार, दहशतवाद, कर्जमुक्तीसाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे त्यांनी नमूद केले.