शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
3
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
4
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
5
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
6
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
7
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
8
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
9
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
10
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
11
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
12
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
13
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
14
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
15
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
16
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
17
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
18
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
19
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
20
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...

नोकरांनीच लांबवले ५० हजारांचे कापड

By admin | Updated: June 19, 2014 00:52 IST

सिल्लोड : शहरातील महावीर कलेक्शनचे मालक राजेश खिंवसरा हे कुटुंबासह विदेश दौऱ्यावर गेल्याची संधी साधून दुकानातील नोकरांनी दुकानामधून पँट पीस, शर्ट पीस असे विविध ५० हजार रुपयांचे कापड लंपास केले.

सिल्लोड : शहरातील महावीर कलेक्शनचे मालक राजेश खिंवसरा हे कुटुंबासह विदेश दौऱ्यावर गेल्याची संधी साधून दुकानातील नोकरांनी दुकानामधून पँट पीस, शर्ट पीस असे विविध ५० हजार रुपयांचे कापड लंपास केले. दुकानमालक आपल्या कु टुंबासह दि. ३१ मे ते १४ जूनपर्यंत विदेश दौऱ्यावर गेले होते. दुकानाचे काम त्यांची वयोवृद्ध आई बघत होती. याचा फायदा घेत आरोपींनी दुकानातील विविध नामांकित कंपन्यांचे कापड संगनमत करून लंपास केले. दुकानमालक विदेश दौऱ्याहून परत आल्यानंतर सदर प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. दुकानमालक राजेश गोकुलचंद खिंवसरा यांच्या फिर्यादीवरून आरोपी ईश्वर आनंदा सांगळे, रा.आव्हाना, ता.भोकरदन, सय्यद युसूफ अल्ताफ, रा.पिंपळगाव पेठ, अमोल त्रिंबक पांडे, विलास रमेश बोराडे, दोघे रा.मंगरूळ, ता.सिल्लोड यांच्याविरुद्ध सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक कांचनकुमार चाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल आबा आव्हाड करीत आहेत. दरम्यान, यातील ईश्वर आनंदा सांगळे, अमोल त्रिंबक पांडे या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींनी चोरलेले कापड कोणाला विकले, याचा शोध पोलीस घेत आहेत. या चोरी प्रकरणातील आरोपी वाढण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. (वार्ताहर)सीसीटीव्हीमुळे फुटले बिंगमहावीर कलेक्शनमध्ये सीसीटीव्ही कॅ मेरे बसविण्यात आलेले आहेत. आरोपींनी नामांकित कंपन्यांचे पँट पीस व शर्ट पीस अशा विविध कापडांची चोरी करताना कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये येऊ नये असा प्रयत्न केला; परंतु नकळत ते चोरी करताना सीसीटीव्हीमध्ये कैद झाले. विदेश दौऱ्याहून आल्यानंतर दुकानमालकाने सीसीटीव्हीचे फुटेज तपासले तेव्हा सदर प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. सीसीटीव्हीच्या फुटेजमध्ये आरोपी कै द झाल्याने त्यांचे बिंग फुटले.