शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

मैदानावरील ५० लाख लिटर पाण्याचा निचरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 00:34 IST

महापालिकेच्या तिजोरीतून ५ कोटी खर्च करून निर्माण केलेले आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट मैदान उद्घाटनासाठी सज्ज होते़ रविवारी मान्यवरांच्या हस्ते या स्टेडिमयचे लोकार्पणही होणार होते़ परंतु अतिवृष्टीमुळे मैदानाला जलमय करून टाकले़ त्यामुळे महापालिकेला लोकार्पण सोहळा पुढे ढकलावा लागला़ परंतु पावसामुळे स्टेडीयमचे कुठलेही नुकसान झाले नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: महापालिकेच्या तिजोरीतून ५ कोटी खर्च करून निर्माण केलेले आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट मैदान उद्घाटनासाठी सज्ज होते़ रविवारी मान्यवरांच्या हस्ते या स्टेडिमयचे लोकार्पणही होणार होते़ परंतु अतिवृष्टीमुळे मैदानाला जलमय करून टाकले़ त्यामुळे महापालिकेला लोकार्पण सोहळा पुढे ढकलावा लागला़ परंतु पावसामुळे स्टेडीयमचे कुठलेही नुकसान झाले नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे़श्री गुरू गोविंदसिंघजी स्टेडियमचे आंतरराष्ट्रीय मानांकनाप्रमाणे विकास कामास २०१४ मध्ये सुरूवात झाली होती़ स्टेडिमयच्या मैदानाचे विकास कामे टप्या- टप्याने करण्यात येत होते़ विकेट ब्लॉक ५, सरावासाठी विकेट ८, तुषार व पाणी निचरा व्यवस्थापनाची कामे पुर्णत्वाला आली आहेत़स्टेडियमवरील व्हीआयपी पॅव्हेलियन, अर्दन माऊंट, ३५ हजार प्रेक्षक गॅलरीचे कामे यापूर्वीच पूर्ण झाले असून क्रिकेट मैदानाचे कामही पूर्ण झाले आहे़ हैदराबाद व नागपूर येथील आंतरराष्ट्रीय स्टेडियमच्या धर्तीवर येथील मैदानाचे काम करण्यात आले आहे़कार्यक्रमाची संपूर्ण तयारी झाली होती़ परंतु शनिवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने स्टेडिमयच्या मैदानावर तळे साचले़त्यामुळे कोट्यवधी रूपये खर्च करून तयार केलेल्या या मैदानाचे नुकसान झाले की काय, असा प्रश्न निर्माण झाला होता़ यासंदर्भात स्टेडिमय व्यवस्थापक रमेश चौरे यांनी सांगितले, मुसळधार पावसाने मैदानावर पाणी साचले असले तरी हे पाणी पूर्णत: बाहेर निघून गेले़ साधारणपणे सात ते आठ तासात मैदान कोरडे झाले़या पावसामुळे पाणी निचरा व्यवस्थापनाचे जे काम केले होते, त्याचा प्रत्यक्षात अनुभव आला़ जवळपास ५० लाख लिटर पाण्याचा व्यवस्थीत निचरा होवून मैदान पूर्ववत झाले़मैदानाचे किंवा येथील कोणत्याही कामाचे नुकसान झाले नाही़ या स्टेडियमवर आता रणजीसह आंतराष्ट्रीय दर्जाचे एकदिवसीय व कसोटीचे क्रिकेट सामने खेळले जाऊ शकतात़