शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

५० कोटींचा अपहार

By admin | Updated: May 8, 2016 01:10 IST

औरंगाबाद : तालुक्यातील चित्तेपिंपळगाव येथील छत्रपती संभाजीराजे साखर कारखान्याच्या नावे बोगस कागदपत्रे तयार केली.

औरंगाबाद : तालुक्यातील चित्तेपिंपळगाव येथील छत्रपती संभाजीराजे साखर कारखान्याच्या नावे बोगस कागदपत्रे तयार केली. कारखान्याची साखर तारण ठेवून दोन बँकांमधून कर्ज उचलून ५० कोटी रुपयांचा अपहार केला. हा प्रकार मागील चार वर्षांच्या काळात घडला आहे. या प्रकरणी कारखान्याचे उपाध्यक्ष दामोदर नवपुते यांच्या तक्रारीवरून उद्योजक विठ्ठलराव अंबरवाडीकर, बँक आॅफ बडोदाचे शाखाधिकारी पी. एन. गायकवाड आणि डोंबिवली नागरी सहकारी बँकेचे शाखाधिकारी पूनम दर्वे या तिघांविरुद्ध क्रांतीचौक ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस निरीक्षक गोवर्धन कोळेकर यांनी सांगितले की, छत्रपती संभाजीराजे साखर कारखान्याने निफाड (जि. नाशिक) येथील कर्मवीर काकासाहेब वाघ सहकारी साखर कारखाना ‘लीज’वर चालविण्यासाठी घेतला होता. तो कारखाना चालविण्याचे उपकंत्राट अंबरवाडीकर इंडस्ट्रीज प्रा. लि. ला देण्यात आले होते. दरम्यान अंबरवाडीकर यांनी ३१ जानेवारी २०१३ रोजी छत्रपती संभाजीराजे साखर कारखान्याच्या नावे बोगस कागदपत्रे, बोगस शिक्का आणि बोगस रजिस्टर नंबर तयार करून बँक आॅफ बडोदा (टिळकपथ शाखा) येथून ३० कोटी रुपयांचे कर्ज उचलले. तसेच त्यानंतर डोंबिवली नागरी सहकारी बँकेतून अशाच खोट्या कागदपत्रांच्या आधारे २० कोटी रुपयांचे कर्ज काढले. विशेष म्हणजे अंबरवाडीकर यांना हे कर्ज देण्यासाठी संबंधित बँकेच्या शाखाधिकाऱ्यांनीही मदत केल्याचा आरोप नवपुते यांनी आपल्या तक्रारीत केला आहे. केवळ राजकीय दबाव निर्माण करण्यासाठी हा गुन्हा दाखल करण्यात आला असून माझ्याविरुद्ध अपहार केल्याचे खोटे आरोप करण्यात येत आहेत. हा गुन्हा तांत्रिक स्वरूपाचा असून हा वाद न्यायप्रविष्ट आहे, असे विठ्ठलराव अंबरवाडीकर यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे. अपहार झालेली रक्कम मोठी आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती क्रांतीचौक ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोवर्धन कोळेकर यांनी दिली. तसेच तात्पुरत्या स्वरूपात हा तपास पोलीस उपनिरीक्षक नाऱ्हेडा यांच्याकडे सोपविल्याचेही त्यांनी सांगितले. निफाडचा कारखाना करारावर चालविण्यासाठी घेतल्यानंतर अंबरवाडीकर यांनी ५० कोटींचे कर्ज उचलले, मात्र सर्व पैसा स्वत:च्या कंपनीत वर्ग केला. यामुळे शेतकऱ्यांची देणी, कामगारांचा पगार, सरकारी देणे, तोडणी, वाहतूकदारांचे पैसे, टॅक्स, एक्साईज, असे एकूण ३० कोटी रुपयांचे देणे बाकी असल्याचा आरोप नवपुते यांनी तक्रारीत केला आहे.