आशपाक पठाण , लातूरतंबाखू, सिगारेट, गुटखा आदी तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन अधिक प्रमाणात वाढल्याने तरूणांमध्ये कर्करोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे़ शाळा-महाविद्यालय परिसरात १०० मीटर अंतरावर बंदी असतानाही त्याची अंमलबजावणी होत नाही़ केवळ महसूल मिळतोय म्हणून शासनाने याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही़ मराठवाड्यात बहुतांश रूग्णांना तोंडाच्या कॅन्सर जडला असून योग्य वेळी उपचार घेतल्यास दिलासा मिळू शकतो़ तरूणांनी ठरविले तर ५० टक्के कॅन्सर हद्दपार होऊ शकतो, असे मत लातूर येथील कॅन्सर तज्ज्ञ डॉ़ ब्रिजमोहन झंवर यांनी व्यक्त केले़जागतिक कर्करोग दिनाच्या निमित्ताने ‘लोकमत’शी बोलताना डॉ़ झंवर यांनी कर्करोगाचा उलगडा केला़ तंबाखूजन्य पदार्थांचे अतिसेवन हे आरोग्यास घातक असतानाही व्यसन ही फॅशन ही बनली आहे़ तरूणांमध्ये याची क्रेझ वाढतच चालली आहे़ त्यामुळे बहुतांश तरूणांना तोंडाच्या कॅन्सरचा उलगडा झाला आहे़ अनेकांना लक्षणे माहिती असल्याने स्वत:ला सर्व गोष्टी जाणवत असल्या तरी मनात भिती बाळगून वैद्यकीय उपचारासाठी काहीजण घाबरतात़ मात्र, योग्य वेळी उपचार झाल्यास कर्करोगापासून बचाव होतो़ तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन टाळल्यास ३० ते ३५ टक्के रूग्णसंख्या सहजपणे घटू शकते असा दावा करीत डॉ़ झंवर म्हणाले, यावर वेळीच आळा घातला नाही तर आगामी २० वर्षांत रूग्णसंख्या दुप्पट होईल़ तरूणांनी व्यसनमुक्तीचा संकल्प केल्यास ५० टक्के कॅन्सरच्या रूग्णांची घटू शकते़ शाळेच्या १०० मीटर परिसरापर्यंत गुटखा व इतर तंबाखूजन्य पदार्थ विकण्यास बंदी असतानाही लातुरात पानटपऱ्या मोठ्या प्रमाणात आहेत़ येथून मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे़ महिलांमध्ये ७० व्या वर्षांपर्यंत ब्रेस्ट कॅन्सर होण्याचे प्रमाण २५ ते ३० टक्के आहे़ रूग्णांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय कसल्याही प्रकारची औषधी घेऊ नयेत़ बहुतांश रूग्ण हे डॉक्टरांपर्यत पोहचत नसल्याने आजार बळावतो़ कॅन्सरचा आजार बळावू नये यासाठी आजाराची माहिती करून घेणे गरजेचे आहे, असेही डॉ़ ब्रिजमोहन झंवर यांनी सांगितले़ ४४कॅन्सरग्रस्त मुलीसाठी पित्याची दोन वर्षांपासून धडपड (वृत्त हॅलो २ वर)\लातूर शहरात दोन कॅन्सरतज्ज्ञ आहेत़ त्यांच्याकडे दररोज २५ ते ३० नवे रूग्ण उपचारासाठी येतात़ त्यामध्ये ५० वर्षांहून कमी वय असलेल्या रूग्णांची संख्या अधिक आहे़ तोंडात लाल, पांढरे चट्टे, आवाज घोगरा, थुंकी, बेडका व शौचातून रक्तस्त्राव, शारिरिक संबंधानंतर होणारा रक्तस्त्राव आदी कर्करोगाची लक्षणे असल्याचे डॉ़ झंवर यांनी सांगितले़ तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन टाळल्यास कर्करोगाचा धोका कमी होऊ शकतो़ सर्वाधिक रूग्ण हे तोंडाचे आहेत़ कॅन्सरतज्ज्ञांची सामाजिक बांधिलकी़़़४सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून व्यावसायिक कक्षेच्या बाहेर जाऊन राज्यभरातील ५० कॅन्सरतज्ज्ञांनी महाराष्ट्र वॉरियर ग्रुपची स्थापना केली आहे़ डॉ़ पंकज चतुर्वेदी व अन्य ज्येष्ठ डॉक्टरांच्या मार्गदर्शनात हा ग्रुप काम करतो़ १५ ते ३५ वयोगटातील तरूणांमध्ये जागृती केली आहे़ बहुतांश रूग्ण हे डॉक्टरांपर्यंत येत नाहीत, त्यासाठी शासकीय रूग्णालयात जिल्हास्तरावर आठवड्यातून २ तास मोफत सेवा देण्याचा संकल्प आहे़ त्यानुसार मी आणि डॉ़ अजय पुनपाळे हे लातूर जिल्ह्यात काम करणार असल्याचे डॉ़ झंवर म्हणाले़
तरुणांनी ठरविल्यास होईल ५० टक्के कॅन्सर हद्दपार
By admin | Updated: February 4, 2015 00:41 IST