शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

५ हजार कि़मी. रस्त्यांची मराठवाड्यात चाळणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 01:21 IST

सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मराठवाडा प्रादेशिक विभागाच्या हद्दीत असलेल्या १८ हजारांपैकी सुमारे ५ हजार कि़मी. रस्त्यांची यंदाच्या पावसाळ्यात चाळणी झाली आहे

विकास राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मराठवाडा प्रादेशिक विभागाच्या हद्दीत असलेल्या १८ हजारांपैकी सुमारे ५ हजार कि़मी. रस्त्यांची यंदाच्या पावसाळ्यात चाळणी झाली आहे. त्या रस्त्यांच्या डागडुजीसाठी अंदाजे २०० कोटी रुपयांची गरज लागणार आहे. खड्डे पडलेले ते रस्ते तातडीने दुरुस्त केले नाहीतर विभागाची मोठ्या प्रमाणात नाचक्की होईलच, शिवाय नागरिकांना होणारा त्रासही वेगळाच असेल. बांधकाम विभागाची कामे करणा-या कंत्राटदारांनी १८ टक्के जीएसटीमुळे कामांवर बहिष्कार टाकला असून, ते वेगळेच आव्हान विभागासमोर आहे. परिणामी, विभागाची प्रचंड गोची झाली आहे. रस्त्यावरील खड्डे दुरु स्तीचे काम हाती घ्यायचे आहे, काम देण्याची तयारी आहे; परंतु कंत्राटदार पुढे येत नसल्यामुळे काय होणार, असा प्रश्न आहे.यंदाच्या पावसाळ्यात खड्डे पडलेल्या रस्त्यांचा प्राथमिक अहवाल विभागाने तयार केला आहे. त्यानुसार शासनाकडे रस्त्यांच्या डागडुजीसाठी अनुदानाची मागणी केली आहे.जिल्हा परिषदेचे रस्ते वगळून १८ हजार कि़मी. रस्ते विभागाकडे आहेत. त्यातील ५ हजार कि़मी.पर्यंत रस्ते यंदाच्या पावसाळ्यात उखडले आहेत. डीएलपी (डिफेक्ट लायबिलिटी पीरियड) अंतर्गत जे रस्ते आहेत, त्यावर पडलेले खड्डे कंत्राटदारांकडून दुरुस्त करण्यात येणार आहेत; परंतु ज्या रस्त्यांची डीएलपी संपलेली आहे. त्या रस्त्यांसाठी नव्याने शॉर्ट टेंडर काढावे लागणार आहे. जीएसटी १८ टक्के आहे, तर व्हॅट २ टक्के होता. त्यामुळे कंत्राटदार टेंडर भरण्यास पुढे येत नाहीत.शासनाने मागील वर्षी खड्डे भरण्यासाठी काहीही अनुदान दिले नाही. त्यामुळे विभागावर मोठ्या प्रमाणात लायबिलिटी वाढली आहे. त्यातच यंदा रस्त्यावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे मागील वर्षाची रक्कम आणि नवीन कामांचा मेळ घालता-घालता विभागाला तारेवरची कसरत करावी लागते आहे. जीएसटीमुळे अडचणी वाढल्या आहेत. तसेच बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील हे ३ वर्षांपासून ३१ आॅक्टोबरपर्यंत महाराष्ट्र खड्डेमुक्त करण्याच्या घोषणा करीत आहेत. दरम्यान मुख्य अभियंता सुरकूटवार यांनी सांगितले, खड्डे मोठ्या प्रमाणात पडले आहेत. विभागाचा आढावा घेतला आहे. जीएसटीबाबत संभ्रम असला तरी कंत्राटदारांचे समुपदेशन केले आहे. रिटर्न मिळणार असल्यामुळे त्यांनी जीएसटी भरला तरी त्यांचे नुकसान होणार नाही. १५ डिसेंबरपर्यंत जास्तीत जास्त रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचा प्रयत्न आहे.