शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जेवत्या गड्याने कमविली ५ एकर ५ गुंठे शेती

By admin | Updated: December 11, 2014 00:42 IST

संदीप अंकलकोटे , चाकूर तोंडावर मिसरूट फुटत असतानाच वडिलांचा आधार कोसळला़ हे दु:ख पचवित असतानाच अवघ्या दोन महिन्यात मायेचे छत्रही हरवले़ त्यामुळे पोटाची भ्रांत पडली़

संदीप अंकलकोटे , चाकूरतोंडावर मिसरूट फुटत असतानाच वडिलांचा आधार कोसळला़ हे दु:ख पचवित असतानाच अवघ्या दोन महिन्यात मायेचे छत्रही हरवले़ त्यामुळे पोटाची भ्रांत पडली़ एका शेतकऱ्याच्या शेतात दोन वेळच्या जेवणावर नोकरी पत्करून संसाराचा गाडा उभारला आणि आज ५ एकर ५ गुंठे शेती घेतल्याची कथा चाकूर तालुक्यातील घारोळा येथील शेतकरी रसुल नबीसाब शेख यांची आहे़ घारोळा येथील रसुल नबीसाब शेख यांना चार भाऊ, आई, वडील, असा परिवार होता़ कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी सर्वजण मोलमजुरी करत़ दोेघा भावांचे आजारात निधन झाले़ त्यानंतर काही काळ उलटताच पितृछत्र हरवले़ त्यापाठोपाठ मायेचा आधारही हरपला़ अशा परिस्थितीत त्यांनी धोंडिराम चिंते यांच्या शेतात जेवता गडी म्हणून नोकरी पत्करली़ त्यानंतर विवाह झाला़ निसर्ग नियमानुसार दोन मुले, एक मुलगी झाली़ पत्नी आणि रसुल शेख यांनी हाती पडेल ते काम करून संसाराचा गाडा उभारला़ झालेल्या कमईतून मासिक पैै पै बचत केली़ या बचतीतून १९९० मध्ये घारोळा शिवारात ३ एकर ५ गुंठे जमीन घेतली़ स्वत:ची जमीन कसण्याबरोबरच दुसरीकडे काम सुरुच ठेवले़ त्याच आधारावर पुन्हा १९९३ मध्ये २ एकर जमीन खरेदी केली़ आज त्यांच्या कुटुंबाकडे ५ एकर ५ गुंठे शेती असून, ती शेती ते स्वत: कसतात़ शेतीतील उत्पन्नातून शेख यांनी दीड लाख रूपये खर्चुन मुलीचा विवाह केला आहे़ आज त्यांचे वय ६५ असून, तेवढ्याच हिरीरीने शेतीकडे पाहतात़ एखाद्या वर्षी नापिकी झाली म्हणून काय झाले़ ती आमच्यासाठी धनच आहे, असे ते सांगतात़ शेतीमध्ये आधुनिक यंत्राचा वापर करीत असून, ठिबक सिंचनावर आता शेती बहरली आहे़ शेती करीत करीत त्यांनी जोड व्यवसायावरही भर दिला आहे़ त्यामुळे एखाद्या वर्षी शेतीने साथ नाही दिली तरी त्याचा आपल्या कुटुंबावर अपेक्षित परिणामी ते जाणवू देत नाहीत़