शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

४८ प्रवासी बालंबाल बचावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 01:00 IST

शिर्डीकडून औरंगाबादला येणाºया एसटी महामंडळाच्या बसचे स्टेअरिंग अचानक लॉक झाल्यामुळे ही भरधाव बस बजाज गेटसमोरील एका झाडावर धडकल्याची घटना शुक्रवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. बसचालकाच्या सतर्कतेमुळे या अपघातात बसमधील ४८ प्रवासी बालंबाल बचावले

लोकमत न्यूज नेटवर्कवाळूज महानगर : शिर्डीकडून औरंगाबादला येणाºया एसटी महामंडळाच्या बसचे स्टेअरिंग अचानक लॉक झाल्यामुळे ही भरधाव बस बजाज गेटसमोरील एका झाडावर धडकल्याची घटना शुक्रवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. बसचालकाच्या सतर्कतेमुळे या अपघातात बसमधील ४८ प्रवासी बालंबाल बचावले आहेत.या विषयी अधिक माहिती अशी की, एसटी महामंडळाच्या शिर्डी आगाराची बस क्रमांक एम.एच.-१४, बी.टी.-३८२४ ही आज शुक्रवारी सकाळी प्रवासी भरून शिर्डीकडून औरंगाबादला येण्यासाठी निघाली होती. अहमदनगर-औरंगाबाद या महामार्गावरून येत असताना अचानक या बसचे स्टेअरिंग लॉक झाल्यामुळे घाबरलेल्या चालकाने बस रस्त्याच्या कडेला घेत असताना बजाज गेटसमोरील एका झाडावर जाऊन धडकली.या अपघातामुळे बसमधील संजय कुंटे (रा. फुलंब्री) यांच्यासह चार ते पाच प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. बसचालक गजानन वानखेडे याने प्रसंगावधान राखत ही बस रस्त्याच्या कडेला घेतल्यामुळे समोरील वाहनावर बस न धडकता ती रस्त्यालगतच्या झाडावर जाऊन धडकली.हा अपघात घडताच बसमधील प्रवाशांनी मदतीसाठी आरडा-ओरडा केल्यामुळे बजाजगेट-वाल्मीरोडवरील हॉटेल व्यावसायिक व रस्त्याने ये-जा करणाºया वाहनधारकांनी अपघातस्थळ गाठून बसमधील प्रवाशांना दिलासा देत त्यांना बसमधून सुखरूपपणे बाहेर काढले. या अपघाताची माहिती मिळताच एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याचे निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार अमोल देशमुख, पोहेकॉ. साळवे, पोकॉ. राजकुमार सूर्यवंशी आदींनी घटनास्थळी धाव घेऊन प्रवाशांना मदत केली.