शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
4
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
5
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
6
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
7
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
8
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
9
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
10
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
11
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
12
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
13
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
14
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
15
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
16
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
17
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
18
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
19
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
20
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच

४८ तासांत लागले धागेदोरे आणि आरोपीही जेरबंद

By admin | Updated: May 23, 2014 00:22 IST

फकिरा देशमुख , बालिकेची क्रूरपणे हत्या करणार्‍या कल्पना गणेश सोनुने- पवार व तिला साथ देणारा पिता हिरालाल पवार या दोघा नराधमांना पोलिस पथकाने अवघ्या ४८ तासांत जेरबंद केले.

 फकिरा देशमुख , भोकरदन पायल या नऊ महिन्यांच्या चिमुकलीसह आठ वर्षांच्या लक्ष्मी या बालिकेची क्रूरपणे हत्या करणार्‍या कल्पना गणेश सोनुने- पवार व तिला साथ देणारा पिता हिरालाल पवार या दोघा नराधमांना पोलिस अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांच्या पथकाने अतिशय जलदगतीने तपास करीत अवघ्या ४८ तासांत जेरबंद केले. दरम्यान, या खळबळजनक प्रकरणातील गुंतागुंत, क्रम तसेच आणखी काही धक्कादायक बाबी लवकरच समोर येतील, अशी माहिती पोलिस अधिकार्‍यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली. वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल वाघमारे यांच्या मुलीचा खंडणीसाठी अपहरण झाल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवरच पारध, भोकरदन व टेंभूर्णी पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांनी अतिशय चपळाईने हालचाली सुरू केल्या. तेव्हा पोलिस सुद्धा चिमुकलीच्या क्रूरपणे केलेल्या हत्येने अक्षरश: चक्रावून गेले होते. पायलचा मृतदेह सापडला परंतु लक्ष्मीचे काय झाले, या विवंचनेने कुटुंबियांबरोबर पोलिसांनी वेगवेगळ्या मार्गाने जलद गतीने तपास सुरू केला. त्यातून मागोवा घेतला. तेव्हा एकेक गोष्टी समोर आल्या. या दुर्देवी घटनेत पायल अनिल वाघमारे (वय ९ महिने) व लक्ष्मी गणेश सोनूने (वय ८ वर्षे) यांचा खून झाला. या दोन्ही मुलींचे अपहरण करून आरोपी महिलेने १९ मे रोजी पायलच्या आईला दीड लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. मात्र मागणी पूर्ण होण्याअगोदरच पायलच्या तोंडावर स्पार्क बांधून तिचा खून करण्यात आला. या घटनेत ग्रा.पं. सदस्य विजय गवळी यांच्या बाथरूममध्ये पायलचा मृतदेह आढळला. तर गवळी यांच्या मोबाईलवरून सदर महिलेने फोन केल्याचे आढळून आले. याप्रकरणी गवळी व त्यांच्या पत्नीस पोलिसांनी अटक केली. दरम्यान, दुसरी अपहृत मुलगी लक्ष्मी सोनुने हिच्या अंगाला दोरीने दगड बांधून विहिरीत फेकून देऊन तिचाही खून करण्यात आला. आता मागे कोणताही पुरावा नाही, असा समज या आरोपींचा झाला. त्यानंतर परत लक्ष्मी व पायलच्या घरासमोर जाऊन आरोपींनी वाईट घटनेमुळे आपण समदु:खी असल्याचा बनाव तयार केला. हे प्रकरण ग्रामपंचायत सदस्य विजय गवळी व त्यांची पत्नी वंदना गवळी यांच्यावरच शेकले जाणार, असा अंदाजही या आरोपींनी बांधला. गवळी यांचा एक महिन्यापूर्वी हरवलेल्या मोबाईलवरूनच यातील मुख्य आरोपी कल्पना सोनूने हिने पायलची आई रेश्मा वाघमारे यांना फोन केला व नंतर तो बंद करून टाकला.मात्र पोलिसांनी केलेल्या तपासात गावातील संदिप नेवरे या तरूणाच्या मोबाईलवर कॉल अधिक झालेले आढळले. त्यामुळे पोलिसांनी संदिप नेवरे यास चौकशीसाठी ताब्यात घेतले.शिवाय गावातील संदीप नावाच्या आणखी एका जणासह तब्बल १० पुरूष तर ५ महिला अशा एकूण १५ जणांना ताब्यात घेतले. यामध्ये कल्पना गणेश सोनूने (वय २६ वर्ष) या महिलेने फोन केल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी सदर आरोपी महिलेस पोलिसी खाक्या दाखविताच तिने सदरील खून आपणच केल्याचे सांगून पोलिसांना मोबाईल, कार्ड व लक्ष्मीला ज्या विहिरीत ढकलले होते, ती विहीर दाखवली. त्यामुळे पोलिसाना मुुख्य सुत्रधार आरोपीस पकडण्यात ४८ तासांच्या आत यश मिळाले. आमच्या निष्पाप मुलींना ठार मारणार्‍या आरोपी कल्पना सोनुने हिच्यासह जे आरोपी यामध्ये सहभागी आहेत, त्यांना तात्काळ फासावर लटकवावे अशी मागणी पायलचे वडील डॉ. अनिल वाघमारे, आई रेश्मा वाघमारे, लक्ष्मी सोनुनेचे वडील गणेश रामू सोनुने व आई अनिता गणेश सोनूने यांनी केली आहे़ १९ मे रोजी पायल हिचा खून करण्यात आला. तिाचा मृतदेह सुद्धा मिळाला. मात्र लक्ष्मीचा शोध पोलिसांना लागत नव्हता. जो पर्यंत या गुन्ह्यातील मुख्य आरोपी मिळत नाही, तोपर्यंत लक्ष्मीचा शोध मिळणे कठीण होते. त्यामुळे जालन्याचे अप्पर पोलिस अधीक्षक वसंत परदेशी, उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रांत देशमुख, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी, विशेष कृती दलाचे श्रीकांत उबाळे, भोकरदनचे पोलिस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, पारधचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शंकर पटवारी, टेभुर्णीचे उमेश कस्तुरे, यांच्यासह पोलिस यंत्रणेच्या सर्व विभागातील पोलिस कर्मचारी यांनी १९ ते २१ मे या दोन दिवस रात्रंदिवस तपासाची चके्र फिरवून या प्रकरणातील मुख्य आरोपी कल्पना सोनुने हिच्या मुसक्या आवळल्या. या प्रकरणाचा तपास पारधचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शंकर पटवारी हे करीत आहेत़वालसांवगी खून प्रकरणातील अटकेत असलेली मुख्य आरोपी कल्पना गणेश सोनूने हिला २२ मे रोजी पोलिसांनी भोकरदन येथील दिवाणी न्यायालयाच्या सहन्यायाधीश एस़सी़साराणी यांच्या समोर उभे केले असता आरोपीला ३१ मे पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले.