शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

४७ हजार शेतकऱ्यांचा सातबारा होणार कोरा

By admin | Updated: June 26, 2017 00:14 IST

नांदेड: दीड लाख रुपयापर्यंतचे कर्ज असलेल्या ४७ हजार २७७ शेतकऱ्यांचे जवळपास २२० कोटींचे कर्ज माफ होऊन सातबारा कोरा होणार आहे़

शिवराज बिचेवार । लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: जिल्ह्यात आजघडीला अडीच लाख शेतकऱ्यांवर दीड हजार कोटींचे कर्ज आहे़ शनिवारी राज्य शासनाने दीड लाख रुपयापर्यंत कर्ज सरसकट माफ करण्याची घोषणा केली आहे़ या घोषणेचा जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना फायदा होणार असून दीड लाख रुपयापर्यंतचे कर्ज असलेल्या ४७ हजार २७७ शेतकऱ्यांचे जवळपास २२० कोटींचे कर्ज माफ होऊन सातबारा कोरा होणार आहे़ कर्जमाफी, हमीभाव यासह इतर मागण्यांसाठी राज्यभरात शेतकरी १ जूनपासून संपावर गेला होता़ या आंदोलनाची शासनाने गंभीर दखल घेत सरसकट कर्जमाफीचा निर्णय घेतला़ त्यामध्ये कर्जमाफीसंदर्भात काही निकषही घालण्यात आले़ सरसकट सर्वच शेतकऱ्यांचा सात बारा कोरा झाल्यास जिल्ह्यातील जवळपास अडीच लाख शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार होता़ अडीच लाख शेतकऱ्यांवर विविध बँकाचे दीड हजार कोटींचे कर्ज होते़ सुरुवातीला या सर्वच शेतकऱ्यांचे कर्ज माफ होवून सातबारा कोरा होणार अशी भावना झाली होती़, परंतु शनिवारी मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीबाबतचे निकष स्पष्ट केले़ त्यानुसार दीड लाख रुपयापर्यंतचे सर्वच शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार आहे़ परंतु दीड लाखांपेक्षा अधिकचे कर्ज असल्यास शेतकऱ्यांना अगोदर त्या वरच्या कर्जाची परतफेड केल्यासच दीड लाख रुपयापर्यंतच्या कर्जमाफीचा फायदा मिळणार आहे़ जिल्ह्यात दीड लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी कर्ज असलेल्या शेतकऱ्यांची संख्या ४७ हजार २७७ एवढी आहे़ त्यामुळे या शेतकऱ्यांचे सर्वच कर्ज माफ होवून त्यांचा सातबारा कोरा होणार आहे़ तर दीड लाखांपेक्षा काही हजारांनी जास्त कर्ज असलेल्या शेतकऱ्यांची संख्या ३ हजार ३८२ आहे़ त्यामुळे या शेतकऱ्यांना थोडीफार परतफेड करुनही आपला सातबारा कोरा करता येणार आहे़ तर दोन लाखांपेक्षा अधिकचे कर्ज असलेल्या शेतकऱ्यांचीही संख्या लक्षणीय आहे़ त्यांनीही वरच्या कर्जाची परतफेड करुन दीड लाख रुपये माफीचा लाभ मिळणार आहे़ कर्जबाजारीपणामुळे जिल्ह्यात महिन्याला आतापर्यंत सरासरी पाच आत्महत्या होत होत्या़ आता सातबारा कोरा होणाऱ्या शेतकऱ्यांना आगामी काळात कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे़