शहरं
Join us  
Trending Stories
1
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
2
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
3
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
4
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
5
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
6
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
7
“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका
8
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 
9
ISIS स्टाईलने हिंदू मुलींचे ब्रेनवॉश; लष्कर-ए-तैयबाच्या निधीतून सुरू होते आग्रा धर्मांतर नेटवर्क
10
धक्कादायक: शिक्षकांना नियमित केले, परंतु आदेश तात्पुरते राहिले, तासिका व रोजंदारीवरच दिल्या नियुक्त्या
11
वनविभागात ‘आयएफएस’ पदांचा खेळ; आता ८ पीसीसीएफ, वनसंरक्षक पदाला कात्री आणि बदल्यांमध्ये सोय
12
"राणे कुटुंबाने खून केलेले लोक हिंदूंच होते, नितेश राणेंनी वडिलांना..."; मनसे नेत्यांचे खळबळजनक आरोप
13
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
14
पगारातून कापला गेलेला TDS आता सहज परत मिळणार, सरकार बदलणार नियम, कधीपासून लागू?
15
'डॉन ३' मधून विक्रांत मेस्सी बाहेर, 'बिग बॉस' विजेता अभिनेता बनणार व्हिलेन? नवी अपडेट समोर
16
सावधान, पावसाळ्यात सर्पदंशाचा धोका अधिक! कशी घ्याल स्वतःची काळजी?
17
'सन ऑफ सरदार २' पोस्टपोन, 'या' सिनेमाला घाबरुन बदलली रिलीज डेट? नवीन तारीख समोर
18
अरेच्चा...! पत्नी मागेच राहिली, केंद्रीय मंत्र्याने १ किमीवरून ताफा पुन्हा मागे वळवला; काय घडलं?
19
"कमी जागा मिळो अथवा जास्त, मुख्यमंत्री नितीश कुमारच होणार", जदयूचा भाजपला स्पष्ट मेसेज, एनडीएमध्ये पेच
20
गिरगाव चौपाटीवर मासेमारीस मज्जाव? बंदर बंद झाल्याने बोटी हटविण्याचे मच्छीमारांना आदेश

भूममध्ये ४६ जणांची माघार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2017 00:19 IST

भूम : उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी पंचायत समिती गणातून २९ तर जिल्हा परिषद गटातून १७ जणांनी अशी एकूण ४६ जणांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे़

भूम : उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी पंचायत समिती गणातून २९ तर जिल्हा परिषद गटातून १७ जणांनी अशी एकूण ४६ जणांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे़ तर पंचायत समितीच्या दहा गणात ४४ तर जिल्हा परिषदेच्या चार गटात १८ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत़ पाथरुड गटातून छाननी दरम्यान काँगेसच्या मनीषा फाळके यांचा अर्ज बाद झाला होता़ त्यांनी न्यायालयात धाव घेतल्याने पाथरुड गटाची अर्ज माघार घेण्याची तारीख दिनांक १० फेब्रुवारीपर्यंत वाढून देण्यात आली आहे़ भूम तालुक्यातील सुकटा गटात पाच उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने सुकटा गटात भाजपा, शिवसेना व राष्ट्रवादीत तिरंगी सामना होत आहे़ ईट गटातून तीन उमेदवारांनी माघार घेतल्याने पाच उमेदवार रिंगणात आहेत़ वालवड गटात चार जणांनी माघार घेतल्याने चौरंगी लढत होत आहे़ आष्टा जिल्हा परिषद गटातून सहा उमेदवारांनी माघार घेतली आहे़ तर इथे तिरंगी लढत होत असून, सहा जण निवडणूक रिंगणात आहेत़ पंचायत समितीच्या दहा जागेसाठी ४४ उमेदवार रिंगणात आहेत़ पाथरुड गणातून एकाने माघार घेतल्याने या गणात चौरंगी लढत होत आहे़ आंबी गणातून पाच उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत़ इथे राष्ट्रवादी, शिवसेना व भाजपात तिरंगी लढत होत आहे़ वालवड गणातून तिघांनी माघार घेतली आहे़ त्यामुळे भाजप, काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादीच्या उमेदवारांमध्ये लढत होत आहे़ चिंचोली गणातून चौघे निवडणूक आखाड्यातून बाहेर पडले आहेत़ इथे राष्ट्रवादी, शिवसेना, एक अपक्ष अशी लढत होत आहे़ आष्टा गणातून तिघांनी माघार घेतली असून, इथे पंचरंगी लढत होत आहे़ माणकेश्वर गणातून तीन उमेदवारांनी अर्ज माघार घेतली आहे़ इथेही पंचरंगी लढत होत आहे़ ईट गणातून केवळ एकाने माघार घेतली आहे़ तर इथे चौरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे़ पखरूड गणातून चार उमेदवारांनी अर्ज निवडणुकीतून माघार घेतली आहे़ इथेही पंचरंगी लढत होणार आहे़ सुकटा गणातून चार उमेदवारांनी अर्ज मागे घेतला आहे़ या गटात मात्र, प्रमुख पक्षासह इतर असे सहा उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत़ आरसोली गणातून तीन उमेदवारांनी अर्ज माघारी घेतल्याने या गणात पंचरंगी लढत होत आहे़