शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

१८ जागांसाठी ४६ उमेदवार

By admin | Updated: March 19, 2017 23:22 IST

धारुर धारूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपाच्या दोन गटात सरळ लढत होणार असल्याचे अर्ज काढणी नंतर स्पष्ट झाले आहे.

अनिल महाजन  धारुरधारूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपाच्या दोन गटात सरळ लढत होणार असल्याचे अर्ज काढणी नंतर स्पष्ट झाले आहे. १८ जागांसाठी ४६ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला एक संघ पॅनल उभा करण्यात यश आले आहे तर भाजपाला मात्र बंडखोरी रोखता आली नाही, असे दिसून येते. ही निवडणूक चुरशीची होणार, असे चित्र दिसत आहे.धारूर बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये दोन गटात चुरशीची लढत होत असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने माजी मंत्री प्रकाश सोळंके यांच्या नेतृत्वाखाली १७ उमेदवारांचे एकसंघ पॅनल देण्यात आले असून भाजपाला मात्र बंडखोरी रोखण्यात अपयश आल्याचे आज चिन्ह वाटप दिवशी स्पष्ट झाले. व्यापारी, ग्रामपंचायत व हमाल मापाडी मतदारांत राष्ट्रवादी तर बहुतांश सोसायटी मतदारांवर भाजपाचे वर्चस्व असल्याने निवडणुका अत्यंत चुरशीच्या होणार आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळ निवडीसाठी ४ एप्रिल रोजी मतदान तर ५ रोजी मतमोजणी होणार आहे. सध्या बाजार समितीवर राष्ट्रवादीचे नेते प्रकाश सोळंके यांचे निर्विवाद वर्चस्व असून रमेशराव आडसकरांच्या भाजप प्रवेशानंतर प्रथमच होत असलेल्या निवडणुकानंतर बाजार समिती कोणाच्या ताब्यात जाणार हे मतदानानंतर स्पष्ट होणार आहे. कृउबाच्या निवडणुकीकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.