शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

मालमत्ता कराचे ४५९ धनादेश बाऊन्स

By admin | Updated: May 14, 2016 00:10 IST

औरंगाबाद : महापालिकेने ३१ मार्चपर्यंत तारेवरची कसरत करीत ८५ कोटी रुपये मालमत्ता कराची वसुली केली. अनेक मालमत्ताधारकांनी मनपाला धनादेश दिले.

औरंगाबाद : महापालिकेने ३१ मार्चपर्यंत तारेवरची कसरत करीत ८५ कोटी रुपये मालमत्ता कराची वसुली केली. अनेक मालमत्ताधारकांनी मनपाला धनादेश दिले. त्यातील ४५९ धनादेश बाऊन्स झाल्याचे निदर्शनास आले आहे. बाऊन्स झालेल्या धनादेशाची रक्कम जवळपासन दीड कोटी असून, मनपा प्रशासन परत मालमत्ताधारकांकडून पैसे भरून घेणार आहे. मालमत्ताधारकांनी पैसे न भरल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.मागील दीड ते दोन वर्षांपासून महापालिका आर्थिक संकटातून प्रवास करीत आहे. मालमत्ता कर वसुली, शासन अनुदान, नगररचना विभागाकडून येणाऱ्या रकमेवर दैनंदिन अर्थव्यवस्था सुरू आहे. मोठी विकासकामे करण्यासाठी तिजोरीत पैसे शिल्लक राहत नाहीत.मनपाने डिसेंबर २०१५ ते मार्च २०१६ पर्यंत मालमत्ता कर वसुलीवर अधिक भर दिला होता. २३० कोटींचे उद्दिष्ट असतानाही मनपाने तब्बल ८५ कोटी रुपये वसूल केले होते. अनेक व्यावसायिक मालमत्ताधारकांनी मनपाला धनादेश दिले होते. ३१ मार्चनंतर हे धनादेश मनपाने बँकेत टाकले. त्यातील ४५९ धनादेश बाऊन्स झाले. मालमत्ताधारकांना तोंडी सूचना देऊन परत एकदा बँकेत हे धनादेश टाकण्यात येणार आहेत. संबंधित मालमत्ताधारकांनी धनादेश बाऊन्स होणार नाहीत, याची काळजी घेतली पाहिजे. वारंवार धनादेश बाऊन्स झाल्यास विधि विभागातर्फे स्वतंत्र कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या कामासाठी एक स्वतंत्र विधिज्ञही नेमण्यात आला आहे.