खुलताबाद : जगप्रसिद्ध वेरूळ लेणी पाहण्यासाठी आलेल्या केरळ येथील पर्यटकाची विसरलेली बँग पुरातत्व विभागाच्या कर्मचाऱ्याने परत केली. या बँगमध्ये रोख ४५ हजार रुपये होते.केरळ येथील पर्यटक जेम्स थॉम्स हे त्यांच्या मित्रमंडळीसोबत गुरुवारी वेरूळ येथील जगप्रसिद्ध वेरूळ लेणी पाहण्यासाठी आले होते. दुपारी लेणी क्रमांक १० पाहत असताना जेम्स थॉम्स यांच्या हातातील बँग बाजूला ठेवली आणि ती घेण्यास विसरले. इतर लेण्या बघत असताना बँग कुठेतरी विसरली असल्याचे थॉम्स यांच्या लक्षात आले. यावेळी कर्तव्यावर असलेले पुरातत्व विभागाचे कर्मचारी कचरू जाधव यांना एक बेवारस बँग दिसली. त्यांनी ही बँग कोणाची म्हणून अशी अनेकांना विचारणा केली. बँगवर कोणीही दावा न केल्याने कचरू जाधव यांनी बँग स्वत:कडेच ठेवली. दुसरीकडे जेम्स थॉम्स हे आपल्या विसरलेल्या बँगेच्या शोधात दहा क्रमांकाच्या लेणीजवळ आले असता त्यांनी या कर्मचाºयाकडे विसरलेल्या बँगविषयी चौकशी केली. कचरू जाधव यांनी ओळख पटवून जेम्स थॉम्स यांच्याकडे त्यांची बँग सुपूर्द केली. थॉम्स यांनी बँग उघडून बघितली असता त्यात ४५ हजार रुपये सुरक्षित होते. जेम्स थॉम्स यांनी कचरू जाधव यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करून त्यांचे आभार मानले.
४५ हजार रुपयांची बँग पर्यटकास केली परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 23:59 IST