शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

४५ टक्के भंगार बसेसवर सुरक्षिततेची ‘वरात’ !

By admin | Updated: January 15, 2017 01:14 IST

जालना सध्या एसटी महामंडळाकडून सुरक्षितता मोहिमेतंर्गत मार्गदर्शनपर उपक्रम राबविले जात आहेत.

हरी मोकाशे जालनासध्या एसटी महामंडळाकडून सुरक्षितता मोहिमेतंर्गत मार्गदर्शनपर उपक्रम राबविले जात आहेत. परंतु, जालना विभागातील जवळपास २० टक्क्यांपेक्षा जास्त बसेस ह्या कालबाह्य झाल्या आहेत, तर ४५ टक्के बसेस खिळखिळ्या झाल्या आहेत. त्यामुळे एसटीची सुरक्षितता मोहीम ही भंगार बसेसवर सुरु असल्याचे दिसून येत आहे.‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ असे ध्येय उराशी बाळगून असलेल्या महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाच्या वतीने प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याअंतर्गतच १ जानेवारीपासून प्रवाशी वाढवा अभियान सुरु आहे. तर १० जानेवारीपासून सुरक्षितता अभियान राबविण्यास सुरुवात झाली आहे. ‘प्रवाशी वाढवा’अंतर्गत वाहकांना उद्दिष्ट देण्यात आले आहे तर सुरक्षिततेतंर्गत जनजागृती, मार्गदर्शन करण्यात येत आहे.एसटी महामंडळाच्या जालना विभागात एकूण चार असून २०१ बसेस आहेत. यात जालना आगारात ८०, अंबडमध्ये ६३ तर परतूर आणि जाफराबाद आगारात यापेक्षा कमी बसेसची संख्या आहे. विभागात गेल्या दोन वर्षांत नव्याने दाखल झालेल्या बसेसची संख्या २० च्या घरातही नाही. त्यामुळे जुन्या बसेसवर एसटीच्या उत्पन्नाची मदार आहे. परंतु, यातील बहुतांशी बसेस ह्या खिळखिळ्या झाल्या आहेत. काही बसेसच्या खिडकीच्या, पाठीमागील बाजूच्या काचा फुटल्या आहेत. त्यामुळे बस थांबली की प्रवाशी सहजपणे खिडकीतून ये- जा करु शकतो. त्याचबरोबर दिशादर्शक बल्ब (इंडिकेटर), आसनांचीही दैना उडाली आहे. तसेच बसला पाठीमागे रेडियम नसणे, समोरील विद्युत बल्ब अचानक बंद पडणे अशा समस्या आहेत. वास्तविक विभागात कालमर्यादा ओलांडलेल्या बसेस ह्या २० टक्क्यांपेक्षा जास्त तर खिळखिळ्या झालेल्या बसेस ४५ टक्क्यांपेक्षा जास्त असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे प्रवाशांनीच या मोहिमेची धास्ती घेतल्याचे दिसून येत आहे.