शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

४४७ बोगस लाभार्थी पालिकेच्या रडारवर..!

By admin | Updated: May 17, 2017 00:44 IST

जालना : शौचालय न बांधणाऱ्या या लाभार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्यासाठी जालना पालिकेच्या वतीने पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात खळबळ उडाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : स्वच्छ महाराष्ट अभियानांतर्गत वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी ४४७ लाभार्थींनी मार्च २०१६ मध्ये ६ हजार प्रति लाभार्थी प्रमाणे अनुदान उचलले. मात्र वर्षभरानंतर शौचालय न बांधणाऱ्या या लाभार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्यासाठी जालना पालिकेच्या वतीने कदीम जालना पोलीस ठाण्यात मंगळवारी तक्रार देण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. एकूणच तब्बल २६ लाख ८२ हजारांचे अनुदान लाटणारे लाभार्थी पालिकेच्या रडारवर आले आहेत. शहर हागणदारीमुक्त व्हावे म्हणून स्वच्छ महाराष्ट्र अभियानंतर्गत वैयक्तिक शौचालय बांधण्यात येत आहेत. यासाठी पालिकेने दीड वर्षांपूर्वी लाभार्थ्यांना दस्तवेज पाहून अनुदान वाटप केले. हागणदारीमुक्त शहर करण्यासाठी पालिकेला शहरात १३ हजार शौचालय बांधणीचे उद्दिष्ट आहे. ३१ मार्च अखेर मोठ्या प्रयत्नानंतर चार हजार नागरिकांनी शौचालय बांधून पूर्ण केले. ३० एप्रिलपर्यंत पुन्हा मुदत वाढवून देण्यात आली. १५ मे अखेर ५ हजार २०३ शौचालयांची कामे पूर्ण झाली. त्यामुळे अद्यापही उद्दिष्टपूर्ती झालेली नाही. याच दरम्यान पालिकेने झालेल्या शौचालय कामांची तपासणी केली असता वरील प्रकार उघडकीस आला. प्रारंभी पालिकेने उद्दिष्टपूर्ती करण्याच्या उद्देशाने ४४७ लाभार्थींच्या खात्यात सहा हजार रूपयांचे अनुदान वर्ग केले. प्रत्यक्षात तपासणी व सर्व्हेक्षणाअंती ४४७ लाभार्थी बोगस असण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सदर लाभार्थींचे आधारकार्ड तसेच निवास पत्त्यात तफावत आहे.पालिकेने संबंधितांना वारंवार सूचना करूनही त्यांनी अनुदान परत केले नाही अथवा बांधकाम केले नाही. त्यामुळे सदर लाभार्थींवर पालिकेने कायदेशीर कारवाई करण्याचे पाऊल उचलले आहे. अभियंता रत्नाकर आडसिरे यांनी संबंधित लाभार्थींवर कारवाई करण्यासाठी मंगळवारी कदीम जालना पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला. यामुळे सदर प्रकरणाची सखोल चौकशी होऊन संबंधितांवर गुन्हेही दाखल होऊ शकतात. अथवा संबंधितांनी कारवाई टाळण्यासाठी पालिकेकडे संपर्क साधून शौचालयाचे बांधकाम पूर्ण करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.