जालना : शहरात महास्वच्छता अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात रविवारी ४२७ टन कचरा उचलण्यात आला. या मोहिमेमध्ये राजकीय मंडळींसह शहरातील उद्योगपती, व्यापारी, अधिकारी, कर्मचारी आणि औद्योगिक वसाहतीतील २६५ कामगार सहभागी झाले होते.सकाळी ७ वाजता या मोहिमेचे उदघाटन पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आ. अर्जुनराव खोतकर, जि.प. अध्यक्ष तुकाराम जाधव, माजी आमदार कैलास गोरंट्याल, अरविंद चव्हाण, नगराध्यक्षा पार्वताबाई रत्नपारखे, माजी नगराध्यक्ष भास्कर अंबेकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष रामेश्वर भांदरगे, किशोर अग्रवाल, सुरेंद्र पित्ती, घनश्यामसेठ गोयल, सतीश भारूका, सुनील रायठठ्ठा, डॉ. सुभाष अजमेरा, सतीश पंच, कैलास लोया, विनीत साहनी, उपजिल्हाधिकारी डॉ. एन.आर. शेळके, सहाय्यक पोलिस अधीक्षक राहुल माकणीकर, अर्जुन गेही, विलास नाईक, नंदासेठ मित्तल, राजेंद्र भारूका, स्वच्छता सभापती रंजना शेळके, मुख्याधिकारी दीपक पुजारी, उपमुख्याधिकारी का.क़ मुखेडकर, जगदीश नागरे, अभय करवा,सुखदेव बजाज, भाऊसाहेब कदम, स्वच्छता विभाग नियंत्रक पी.ए. पाटील, प्रशासन अधिकारी धर्मा खिल्लारे, स्वच्छता विभागप्रमुख डी.टी. पाटील, अनया अग्रवाल, रमाकांत धर्माधिकारी, नगरसेविका अरूणा जाधव, पंडितराव भुतेकर, विष्णू पाचफुले, डॉ. कैलास सचदेव, हरीष तलरेजा, डॉ. श्रीमंत मिसाळ आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.उद्योजकांनी या अभियानासाठी ८ जेसीबी, २७ ट्रॅक्टर आणि कामगारांचे एक दिवसाचे सहकार्य होते. शहरातील दैनंदिन सफाई करताना दररोज ५० ते ६० टन कचरा उचलण्यात येतो. स्वच्छ भारत अभियानअंतर्गत विशेष महास्वच्छता मोहिमेतून २८ जून रोजी ३४५ टन व ५ जुलै रोजी ४२७ टन कचरा उचलण्यात आला. (प्रतिनिधी)जालना शहरात महास्वच्छता अभियान राबविण्यात येत असून त्यासाठी सर्व नागरिकांनी एकत्रित यावे, असे आवाहन पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या अभियानाचे उदघाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. ४पालकमंत्री लोणीकर म्हणाले की, शहरात आजघडीला ५० हजार टन कचरा साचला असून त्याची साफसफाई करणे हे केवळ नगरपालिकेचेच काम नाही. नागरिकांनीही आपली मानसिकता बदलून स्वच्छतेच्या लढ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन लोणीकर यांनी केले.४यावेळी आ. खोतकर म्हणाले की, स्वच्छतेची चळवळ होणे गरजेचे आहे. नागरिकांनी या कार्यालयात पुढाकार घेऊन योगदान द्यावे, असे आवाहन खोतकर यांनी केले.
जालना शहरात ४२७ टन कचरा उचलला
By admin | Updated: July 6, 2015 00:17 IST