शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

४२६ दारू दुकानांना टाळे

By admin | Updated: April 2, 2017 00:15 IST

उस्मानाबाद : जिल्ह्यातील देशी-विदेशी दारूविक्रीच्या ४८५ दुकानांपैकी तब्बल ४२६ दुकानांना सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे शनिवारी टाळे लागले़ ‘

उस्मानाबाद : जिल्ह्यातील देशी-विदेशी दारूविक्रीच्या ४८५ दुकानांपैकी तब्बल ४२६ दुकानांना सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे शनिवारी टाळे लागले़ ‘ड्राय-डे’ नसतानाही दारूविक्रीची दुकाने बंद असल्याने दारूविक्रेत्यांसह तळीरामांचीही मोठी गोची झाल्याची चर्चा रंगली होती़सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या एका याचिकेवरील सुनावणीनंतर न्यायालयाने राष्ट्रीय आणि राज्य मार्गावर ५०० मीटरच्या आतमध्ये असलेली देशी, विदेशी, वाईन विक्रीची दुकाने बंद करण्याचे आदेश दिले आहेत़ २० हजार लोकवस्ती असलेल्या भागातील राष्ट्रीय, राज्य मार्गापासून २२० मीटर दूर दुकाने ठेवण्याबाबत सूचित करण्यात आले आहे़ सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशात ३१ मार्चनंतर अशा देशी, विदेशी, वाईन शॉप, परमीटररूम, बिअरशॉपी, क्लब लायसन्स आदींना परवाने देऊ नयेत, अशा सूचना दिल्या होत्या़ यातील अनेक दुकानांना माल पुरवठाही बंद करण्यात आला होता़ तर काहींनी माल खरेदी न करणेच पसंत केले होते़ सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार १ एप्रिल रोजी जिल्ह्यातील तब्बल ४२६ दुकाने बंद ठेवण्यात आली होती़ यात देशी दारूची ४८, सहा वाईनशॉप,२४१ परमीट रूम, ३ क्लब लायसन, १२८ बिअरबार बंद झाले आहेत़ यातउमरगा विभागातील १४ देशी दारूची दुकाने, एक वाईनशॉप, ४५ परमीटरूम तर ३१ बिअरशॉपी असे ९१ दुकाने बंद झाले आहेत़ उस्मानाबाद विभागातील देशी दारुची १२, २ वाईनशॉप, ५५ परमीटरूम, १८ बिअर शॉपी अशी ८७ दुकाने बंद झाली आहेत़ भूम विभागातील देशीदारूची १३, एक वाईनशॉप, ८८ परमीटर रूम, २ क्लब लायसन्स तर ४२ बिअर शॉपी असे १४६ दुकाने बंद झाली आहेत़ तर तुळजापूर विभागातील देशी दारूची ४८, सहा वाईनशॉप, २४१ परमीटरूम, ३ क्लब लायसन्स तर १२८ बिअर शॉपी बंद झाली आहेत़ जिल्ह्यातील ४८५ देशी-विदेशी, बिअर, वाईन विक्री करणाऱ्या व्यवसायिकांकडून शासनाला जवळपास पावणेतीन कोटी रूपयांचा महसूल मिळत होता़ परवाना नुतनीकरणातूनही चांगला महसूल मिळत होता़ मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अनेकांचे परवाने नुतनीकरण झालेले नाही़ तर तब्बल ४२६ दुकानांना टाळे लागले आहे़ ही दुकाने वर्षभर बंद राहिली तरी जवळपास सव्वादोन कोटी रूपयांचा महसूल बुडणार आहे़ अनेकांनी दुकाने इतरत्र टाकण्यासाठी जागेची शोधमोहीम सुरू केली असून, अनेकांनी ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’ची भूमिका घेतली आहे़ दुसरीकडे मोठ्या प्रमाणात महसूल बुडणार असल्याने शासन कोणता तोडगा काढते का ? याकडेही दारूविक्री करणाऱ्या व्यसायिकांचे लक्ष वेधले आहे़