शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
4
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
5
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
6
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
7
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
8
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
9
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
10
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
11
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
12
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
13
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
14
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
15
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
16
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
17
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
18
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
19
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!

शेती कर्जाचे ४१३ कोटी रुपये वसूल

By admin | Updated: November 30, 2014 00:56 IST

शिरीष शिंदे ,बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखांकडून २०१३-१४ या वर्षभराच्या कालावधीत ८५८ कोटी रुपयांपैकी ४१३ कोटी रुपयांचे पीक कर्ज वसुल करण्यात आले

शिरीष शिंदे ,बीडजिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखांकडून २०१३-१४ या वर्षभराच्या कालावधीत ८५८ कोटी रुपयांपैकी ४१३ कोटी रुपयांचे पीक कर्ज वसुल करण्यात आले असल्याची माहिती डीसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण कदम यांनी दिली. ही वसूली निम्म्याहुन कमी असल्याने आगामी वर्षात वसूली वाढविण्याच्या सूचनाही कदम यांनी शाखाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जिल्ह्यात ५९ शाखा आहेत. या शाखार्तंगत सेवा सहकारी संस्थाना यापुर्वी कर्ज वाटप करण्यात आलेली आहे. अनेक संस्था कर्ज देण्यासाठी धजावत नसल्याने मुख्य शाखेच्या आदेशानुसार वसुली मोहिम राबविण्यात आली आहे. जिल्ह्यातील संस्थांना शेती कर्ज देण्यात आले आहे. २०१३-१४ साठी डीसीसीच्या ५९ शाखांना ८५८ कोटी रुपये वसुलीचे उद्दीष्ट दिले होते. मात्र वर्षा अखेरीस ५९ शाखांतंर्गंतत ४२.५० % टक्केच म्हणजे ४१३ कोटी रुपये उद्दीष्ट गाठण्यास यश मिळाले आहे. अद्याप ४४५ कोटी रुपये वसूल होणे बाकी आहे. दरम्यान, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनुसार प्रत्येक वर्ष बँकेचा वसूली हंगाम नोव्हेंबर महिन्यापासून सुरु होत असतो. या वर्षीचा हंगाम शनिवार अर्थात १ नोंव्हबर पासून सुरु होणार आहे. सेवा सहकारी संस्था थकबाकीदाराविरुद्ध कर्ज वसूलीसाठी कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे. त्यानुसार वसूलीची दिशा ठरविण्यात येणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी कदम यांनी सांगितले. थकबाकीदारांविरुद्ध महाराष्ट संस्था अधिनियम १९६० चे कलम १०१ नुसार कारवाई करणे सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले. सूचना व नोटिसा देण्याचे काम वेगाने सुरु आहेत. याची दखल घेतली गेली नाही तर सेवा सहकारी संस्थावर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार असल्याचे कदम यांनी सांगितले. ३८७ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटपजिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखांना सन २०१४-१५ साठी ४४८ कोटी रुपये पीक कर्जाचे वापट करण्याचे उद्दीष्ट देण्यात आले होते. त्या पैकी खरीप/रब्बी हंगामासाठी ३० आॅक्टोबर २०१४ रोजी पर्यंत ३८७ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यत आले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. ८१ हजार ६३२ हेक्टर क्षेत्रासाठी हे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. दिलेल्या उद्दीष्टापैकी ६१ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले नाही. परंतु ९० टक्क्यांच्या जवळपास पीक कर्ज वाटप झाले असल्याचे स्पष्ट होत आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार,२०१५-१६ साठीचे पीक कर्जासाठीचा आराखडा लवकरच तयार करण्यात येणार आहे. त्यानुसार नवीन पीक कर्जाचे उद्दीष्ट निश्चित केले जाईल. ४जिल्हा बँक पूर्वरत आणण्यासाठी मध्य मुदत कर्ज, थेट कर्ज, बिगर शेती कर्ज, सेवा सहकारी संस्था यांच्याकडे कोट्यवधी रुपयांचे कर्ज वाटप झाले आहे. गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत बनावट कागदपत्रे दाखल करुन कर्ज घेतल्या प्रकरणी अनेक संस्थांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. डीसीसी बँकेच्या पैशांचा अपव्यय करण्यात आला असल्याने फौजदारी कारवाई करण्यात झाली होती. वसूली पूर्णत: झाल्यानंतरच बँक खातेदारांचा विश्वास निर्माण होऊ शकतो. त्यामुळे जिल्ह्यातील डीसीसी बँकाच्या वसूली अधिकारी व शाखा व्यवस्थांपकावर थकीत कर्ज वसूलीचे एक प्रकारे आव्हानच आहे.