शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

स्पेशालिस्ट डाॅक्टरांची ४० पदे, पण मुलाखतीसाठी एकच डाॅक्टर हजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:02 IST

औरंगाबाद : घाटी रुग्णालयासाठी स्पेशालिस्ट डाॅक्टरांची ४० पदे भरण्यासाठी सोमवारी मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते; परंतु केवळ एकच डाॅक्टर ...

औरंगाबाद : घाटी रुग्णालयासाठी स्पेशालिस्ट डाॅक्टरांची ४० पदे भरण्यासाठी सोमवारी मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते; परंतु केवळ एकच डाॅक्टर मुलाखतीला हजर राहिले. त्यामुळे घाटीला स्पेशालिस्ट डाॅक्टर मिळणे कठीण असल्याचे चित्र आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने घाटीवर रुग्णसंख्येचा भार दिवसेंदिवस वाढतच आहे. स्पेशालिस्ट डॉक्टर, स्टाफ नर्स आणि अन्य कर्मचारी अपुरे पडत आहेत. त्यामुळे घाटी प्रशासनाने इंटेसिव्हिस्ट, अ‍ॅनेथिसिस्ट, जनरल फिजिशियन, चेस्ट फिजिशियन यांची प्रत्येकी १० पदे, स्टाफ नर्सची १०० पदे आणि विविध संवर्गातील कर्मचारी, अशी एकूण १७७ पदे तीन महिन्यांसाठी तात्पुरत्या स्वरूपात थेट मुलाखतीद्वारे भरण्याचा निर्णय घेतला. स्पेशालिस्ट डॉक्टरांना प्रतिमहिना सव्वालाख रुपये वेतन देण्यात येणार आहे; परंतु या वेतनात कोणी काम करण्यास इच्छुक नसल्याचे पाहायला मिळत आहे. त्याउलट ड्यूटी मेडिकल ऑफिसर या पदासाठी बीडीएस, ‌बीएएमएस, ‘बीएचएमएस’ यांचे जागेपेक्षा अधिक अर्ज आले. स्टाफ नर्सच्या १०० पदांसाठी २० अर्ज आले. उपअधिष्ठाता डॉ. कैलास झिने, डॉ. सिराज बेग आदींनी मुलाखतीची प्रक्रिया पार पाडली. आता १६ एप्रिल आणि २० एप्रिल रोजीही याच पदांसाठी मुलाखती होणार आहेत. किमान तेव्हा तरी स्पेशालिस्ट डॉक्टर मिळतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.