शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

४० टक्के धान्य लॅप्स !

By admin | Updated: June 29, 2014 00:37 IST

आशपाक पठाण , लातूर अन्न सुरक्षा योजना, अंत्योदय, एपीएल आदींसाठी शासनाकडून पुरवठा करण्यात येणारे स्वस्त धान्य जून महिन्यांत लाभार्थ्यांना मिळाले नसल्याने लाभार्थ्यांची गैरसोय वाढली आहे़

आशपाक पठाण , लातूरअन्न सुरक्षा योजना, अंत्योदय, एपीएल आदींसाठी शासनाकडून पुरवठा करण्यात येणारे स्वस्त धान्य जून महिन्यांत लाभार्थ्यांना मिळाले नसल्याने लाभार्थ्यांची गैरसोय वाढली आहे़ तर दुसरीकडे धान्य देणार कधी, या चौकशीसाठी दुकानदारांचे पुरवठा विभागाकडे खेटे सुरू आहेत़ २० तारखेपर्यंत धान्य उचलले नसल्यामुळे ४० टक्के धान्य लॅप्स झाल्याची माहिती समोर आली आहे़ यात चूक नेमकी कोणाची? या विषय संशोधनाचा बनला आहे. अन्न सुरक्षा योजनेमुळे स्वस्त धान्य दुकानांत खरेदीसाठी लाभार्थ्यांची संख्या वाढली आहे़ एपीएलधारकांचे धान्य उचलल्याशिवाय अन्न सुरक्षा योजनेतील धान्य मिळत नसल्याची ओरड आहे़ महिन्याच्या शेवटी दरमहा स्वस्त धान्याचे वितरण केले जाते़ जून महिन्यातील धान्याचा जवळपास ४० टक्के कोटा लॅप्स झाल्याने लातूर, अहमदपूर, निलंगा या तीन तालुक्यांत लाभार्थ्यांची ओरड वाढली आहे़ काही ग्राहक स्वस्त धान्य दुकानदारांशी हुज्जत घालत असल्याची ओरड आहे़ शासनाकडून मिळालेच नसल्याने धान्य नेमके द्याचे कोठून, असा प्रश्न विके्रत्यांना पडला आहे़ जिल्ह्यात दरमहा ९ हजार ५०० मेट्रिक टन धान्य वाटप केले जात असल्याची माहिती पुरवठा विभागाच्या दप्तरी नोंद आहे़ एफसीआयच्या गोदामातून दरमहा धान्य उचलावे लागते़ मात्र, जून महिन्यात कंत्राटदार व हमालांनी संप केल्याने वेळेत धान्य उचलण्यात आले नाही़ त्यामुळे ४० टक्के धान्याचा कोटा लॅप्स झाल्याची माहिती पुरवठा विभागातून देण्यात आली़ जळकोट, देवणी, औसा, शिरूर अनंतपाळ, रेणापूर, चाकूर तालुक्यात जूनचे अन्नधान्य मिळाले असले तरी लातूर, अहमदपूर, निलंगा येथील लाभार्थ्यांकडून ओरड वाढली आहे़ लाभार्थ्यांची ओरड...जिल्हा पुरवठा विभागाकडून जुनचे धान्य वाटप झाले नसल्याने स्वस्त धान्य दुकानदारांची चांगलीच गोची झाली आहे़ अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांकडून विके्रत्यांकडे वारंवार विचारणा केली जात आहे़ परंतू धान्य मिळालेच नसल्याने आम्ही तरी देणार कोठून? असा प्रश्न लातूर शहरातील एका विक्रेत्याने सांगितले़ या महिन्यात लॅप्स झालेले धान्य पुन्हा पुढच्या महिन्यात मिळणे शक्य नाही़ अन्न सुरक्षेमुळे स्वस्त धान्य लाभार्थ्यांची खरेदीसाठी गर्दी वाढली आहे़ मात्र सध्या धान्यच मिळाले नसल्याने गरजूंची गैरसोय होत आहे़ दिल्लीतून मिळणार मुदतवाढ़़़़दरमहा २० तारखेपर्यंत धान्य उचलावे लागते़ या महिन्यात हमाल-कंत्राटदारांनी संप केल्याने वेळेत धान्य उचलण्यात आले नाही़ ४० टक्के धान्य लॅप्स होण्यास संबंधित वाहतूक ठेकेदार, हमाल जबाबदार आहेत़ एपीएलचे धान्य अगोदर उचलावे लागते़ मात्र ठेकेदाराने वाहने पुरविली नाहीत़ त्यामुळे धान्य लॅप्स झाले आहे़ यापूर्वी एफसीआयच्या पुणे कार्यालयातून लॅप्स झालेले धान्य एका दिवसांत मिळत होते़ लॅप्स झालेले धान्य मिळणार का..?आता ही प्रक्रिया दिल्लीतून सुरू झाल्याने जवळपास आणखी ४ ते ५ दिवस उशीर लागणार असून लॅप्स झालेले ४० टक्के धान्य मिळणार आहे़ त्यातून अहमदपूर, लातूर, निलंगा तालुक्याला पुरवठा केला जाणार आहे़ या तीन्ही तालुक्यांतील अंत्योदय लाभार्थ्यांचे धान्य देण्यात आल्याचे पुरवठा विभागातील पेशकार घुगे यांनी सांगितले़