शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

४० कोटींचा चिनी माल औरंगाबादेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2017 00:14 IST

भारत व चीनमधील तणावाचा परिणाम आता स्थानिक बाजारपेठेतही जाणवू लागला आहे. सोशल मीडियावर ‘नो चायनिज’ ही मोहीम जोर धरते आहे

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : भारत व चीनमधील तणावाचा परिणाम आता स्थानिक बाजारपेठेतही जाणवू लागला आहे. सोशल मीडियावर ‘नो चायनिज’ ही मोहीम जोर धरते आहे. या जनजागृतीमुळे ग्राहकही ‘मेड इन चायना’ वस्तू घेण्याचे टाळत आहे. लोकभावना व देशप्रेमामुळे व्यापाºयांनीही आता चिनी वस्तू मागविणे कमी केले आहे; परंतु सध्या बाजारपेठेत सुमारे ४० कोटी रुपयांच्या लहान-मोठ्या हजारो चिनी वस्तूंचा स्टॉक पडून आहे. त्याचे काय करायचे, असा यक्ष प्रश्न व्यापाºयांना पडला आहे.चीनने पाकिस्तानी दहशतवाद्यास पाठिंबा दिल्यापासून देशात चीनविरोधी जनभावना निर्माण होऊ लागली आहे. मागील दोन महिन्यांत डोकलाम मुद्दावरून चीनने भारतावर डोळे वटारण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर आपले सैन्य जसे सीमेवर लढत आहे त्याप्रमाणे नागरिकांनी चिनी वस्तूंचा बहिष्कार करून आर्थिक युद्धात योगदान द्यावे, असे आवाहन करणारे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाले. याचा परिणाम सध्या बाजारपेठेवर दिसतो आहे. कल्पकता व नावीन्यतेच्या आधारावर ड्रॅगनने २००० साली बाजारपेठेत मुसंडी मारली होती. आता कॉम्प्युटर, टीव्ही, फर्निचरपासून ते अगरबत्तीपर्यंत ‘मेड इन चायना’ने दबदबा निर्माण केला आहे. आजघडीला बाजारपेठेत विविध क्षेत्रांत मिळून सुमारे ४० कोटी रुपयांचा चिनी माल शिल्लक असल्याचा अंदाज जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष अजय शहा यांनी वर्तविला.इलेक्ट्रॉनिक्समध्ये चिनी भागइलेक्ट्रॉनिक्समध्ये टीव्हीपासून मोबाइल, कॉम्प्युटर, लॅपटॉप, सोलार वॉटर गीझरपर्यंत सर्वच उपकरणांत ७० ते ८० टक्के चिनी बनावटीचे सुटे भाग आहेत, तसेच ८० टक्के मोबाइल अ‍ॅक्सेसरीज चीनच्याच आहेत. चीनमधून इलेक्ट्रॉनिक्स पार्ट आणून अनेक उत्पादक आपल्या देशात असेंम्बल करतात. चिनी मोबाइलवर बहिष्कार टाकता येईल; परंतु प्रत्येक उपकरणातील चिनी भाग कसे हटविता येतील, असा प्रश्न वितरकांनी उपस्थित केला.२६ जानेवारीला शहरात चिनी बनावटीचे तिरंगी ध्वज आले होते. आता १५ आॅगस्टसाठी सजावटीच्या वस्तूंनी दुकाने फुलली आहेत. यात चिनी बनावटीचे तिरंगी ध्वज गायब झाल्याचे दिसते.ग्राहकही भारतीय बनावटीचे साहित्य द्या, अशी मागणी करताना दिसतात.