शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

मनपा कर्मचाऱ्यांना ४० लाखांचे अग्रिम

By admin | Updated: October 17, 2014 23:55 IST

औरंगाबाद : महापालिकेच्या तृतीय श्रेणीतील कर्मचाऱ्यांचा दिवाळसण आनंदात जाणार आहे.

औरंगाबाद : महापालिकेच्या तृतीय श्रेणीतील कर्मचाऱ्यांचा दिवाळसण आनंदात जाणार आहे. मनपा प्रशासनाने ४० लाख रुपये इतकी रक्कम दिवाळसणासाठी अग्रिम म्हणून देण्याचा निर्णय आज घेतला. चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांचे बोनसकडे लक्ष लागले आहे.आयडीबीआय आणि एचडीएफसी बँकेत ४० लाख रुपये इतकी रक्कम जमा करण्यात आली आहे. दोन दिवसांत ती रक्कम कर्मचाऱ्यांच्या हाती पडेल. वर्ग ३ च्या कर्मचाऱ्याला ५ हजार रुपये अग्रिम मिळेल. कर्मचाऱ्यांना १ आॅक्टोबर रोजी वेतन करण्यात आले. ११ कोटी ५० लाख रुपयांची रक्कम पालिकेने अदा केली. दीड हजार कर्मचाऱ्यांना २,४७५ रुपये दिवाळी बोनस मिळण्याबाबत अजून अनिश्चितता आहे. कर्मचाऱ्यांच्या बोनसचा विचार २१ आॅक्टोबरपर्यंत होण्याची शक्यता आहे. ठेकेदारांचे ३२ कोटी रुपये, सप्टेंबरमधील वेतन आणि कर्जहप्ते व समांतरची देणी मिळून ५६ कोटी रुपये मनपाला लागणार आहेत. त्यातच बोनस व अग्रिम मिळून अंदाजे दीड कोटी रुपये लागतील. गेल्या दिवाळीला ४ हजार ८८३ कर्मचाऱ्यांना बोनस व अग्रिम रक्कम अदा करण्यात आली होती. वर्ग-३ च्या कर्मचाऱ्यांना ५ हजार अ‍ॅडव्हान्स, दैनिक वेतनावरील व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना १ हजार दिवाळी भेट दिली होती. महिला बचत गट आणि लिंक वर्कर्सला २ हजार दिवाळी भेट, तर दैनिक वेतनावरील वर्ग- ३ च्या कर्मचाऱ्यांना ३ हजार अ‍ॅडव्हान्स दिले होते. आज पालिकेने फक्त तृतीय श्रेणीतील कर्मचाऱ्यांना अग्रिम देण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या तिजोरीत १८ कोटी रुपयांची रक्कम आहे.