शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

खरेदी-विक्री संघासाठी ४0 अर्ज

By admin | Updated: April 26, 2016 23:42 IST

हिंगोली : तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाला पूर्वीसारखे वैभव राहिले नसले तरीही निवडणुकीत मात्र इच्छुकांची भाऊगर्दी झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

हिंगोली : तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाला पूर्वीसारखे वैभव राहिले नसले तरीही निवडणुकीत मात्र इच्छुकांची भाऊगर्दी झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशीपर्यंत एकूण ४0 अर्ज आले आहेत.यामध्ये सोसायटी मतदारसंघात गोदावरी भगवान शिंदे, जगन नामदेव लोथे, केशव ग्यानु शांकट, जनार्दन चंद्रभान वैद्य, गोविंद फुलाजी भवर, श्रीराम कुंडलिका पठाडे, भारत मारुती बर्वे, भानुदास गोविंदराव वाबळे, नारायण व्यंकटराव जगताप, रुपाजी किशनराव गायकवाड, शंकर सीताराम शिंदे, गुलाबराव रामजी सरकटे, केशव शेषराव नाईक, शहरी विभाग मतदारसंघातून अशोक रामकृष्ण बासटवार, उमेश पांडुरंग नागरे, राजाराम तुकाराम बांगर, सचिन सूर्यकांत गुंडेवार, खेडे विभाग मतदारसंघातून सत्यनारायण रामकिशन तापडीया, राजाराम तुकाराम बांगर, रमेश विठ्ठलराव शिंदे, कुंडलिक मारोतराव नागरे, रामेश्वर आंबादास फाळके यांचा समावेश आहे.महिला राखीव मतदारसंघातून वनमाला पांडुरंग नागरे, प्रमिला राजाराम बांगर, गोदावरी भगवान शिंदे, प्रयाग बळीराम बांगर, अनुसूचित जाती - जमाती मतदारसंघात बालासाहेब गंगाराम आरळकर, गंगाराम सखाराम लोणकर, इतर मागासवर्ग मतदारसंघात भिकाजी दगडुजी मोहनकर, बिरजू नंदलाल यादव यांचा समावेश आहे. विजाभज-विमाप्र मतदारसंघात राजाराम तुकाराम बांगर, उमेश पांडुरंग नागरे, रामचंद्र नामदेवराव वैद्य यांचा समावेश आहे.यातील अनेकांनी दोन वेगवेगळ्या मतदारसंघात अर्ज दाखल केले आहेत. २७ एप्रिलपर्यंत छाननी होणार आहे. १२ मे ही अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख तर २२ मे रोजी मतदान व मतमोजणी होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डी. एल. डुकरे हे काम पहात आहेत.खरेदी-विक्री संघाचे हाल पहाता निवडणूक घेणेही परवडणारी बाब नाही. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न केले जाण्याची शक्यता आहे. १२ मेपर्यंत वेळ असल्याने आता त्यासाठी फिल्डिंग लावली जाते की, मतदान होणार हे त्यानंतरच कळणार आहे . (प्रतिनिधी)उकाडा वाढलाकौठा- वसमत तालुक्यात कौठा व परिसरात उन्हाचा पारा वाढत असून उकाड्याने जनता त्रस्त झाली आहे. उन्हामुळे उष्माघाताचे प्रमाण वाढले आहे. यामुळे शेतीच्या कामावर परिणाम दिसून येत आहे. ग्रामस्थ घराबाहेर पडण्यास धजावत नाहीत. उष्माघातापासून बचाव करून घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.